आपला महाराष्ट्र

Supriya Sule

पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही; गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले

Devendra Fadnavis

आमच्यात कसलीही स्पर्धा नाही; आम्ही ‘इन्फ्रा फॅमिली’, एकनाथ शिंदेंसोबतच्या श्रेयवादाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर तसेच येथील पायाभूत सुविधांवर भाष्य केले. तसेच महायुतीमधील अंतर्गत राजकारणावरही त्यांनी भाष्य केले आहे.

Eknath Shinde

मी जे करतो ते मोकळेपणाने करतो, लपून-छपून नाही; अशोक खरात प्रकरणावर एकनाथ शिंदेंचे उत्तर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना राज्यातील पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि चालू राजकीय घडामोडींवर आपली परखड मते मांडली.

govinddev giri maharaj

govinddev giri maharaj : गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची उद्या पासून नाशिककरांना तीन दिवसांची संधी!!

गोविंददेव गिरी महाराज यांच्या मुखातून तथागत कथा ऐकायची नाशिककरांना उद्या पासून तीन दिवसांची संधी मिळणार असून येत्या १ मे ते ३ मे २०२६ असा तीन दिवसांचा कार्यक्रम वसंत व्याख्यानमाला आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने आयोजित केला आहे.

काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!

काँग्रेसच्या माघारीचा त्रिफळा; पवार + ठाकरेंकडून राजकीय इज्जतीचा चोळामोळा!!, हेच राजकीय वास्तव आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आले‌.

विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र; पवार विरुद्ध पवारचा उलटला डाव!!

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे टाकावे लागले शस्त्र आणि पवार विरुद्ध पवार हा डाव सुद्धा उलटला!!, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले हे वास्तव आज सुप्रिया सुळे यांच्या तोंडून बाहेर आले.

अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी संजय राऊतांची काँग्रेसला पुढच्या पंतप्रधान पदाची ऑफर!!

विधान परिषदेतले ठाकरे सेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी संजय राऊत यांनी काँग्रेसला थेट पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची ऑफर देऊन टाकली.

Zeeshan Siddique

८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीची मॅरेथॉन बैठक, देवेंद्र फडणवीसांची भेट; नंतर उमेदवारी जाहीर!!

एक दोन नव्हे, तर तब्बल ८० इच्छुकांच्या गर्दीतून झिशान सिद्दिकींना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मॅरेथॉन बैठक घ्यावी लागली. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यावी लागली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली.

Dr. Narendra Dabholkar

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तर सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी शरद कळसकरचा जामीन मंजूर केल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Raosaheb Danve,

Raosaheb Danve : मविआकडून अंबादास दानवे विधान परिषदेवर जाणार; आदित्य ठाकरेंची घोषणा; शरद पवार गटाचा पाठिंबा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत चेहरा कोण असेल, यावरून सुरू असलेल्या सस्पेन्सचा अखेर पडदा फासला आहे. स्वतः उद्धव ठाकरे या निवडणुकीत उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Vijay Vadettiwar

Vijay Vadettiwar : ठाकरे गटाने काँग्रेसशी चर्चा न करता दानवेंना उमेदवारी दिली; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला या प्रकरणी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. तर भाई जगताप यांनी काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देईल असे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

Devedra Fadanvis

Devedra Fadanvis : राज्य सरकारचे 7 मोठे निर्णय; दिव्यांगाच्या शिक्षण भरारीला आणखी बळ, बाबासाहेबांच्या नावे शिष्यवृत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाने आज 7 महत्त्वाच्या निर्णयांवर आपली मोहोर उमटवली. यात सरकारने दिव्यांगांच्या शिक्षणाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय घेतला असून, हरित महाराष्ट्र आयोगाचीही स्थापना केली आहे. सरकारने सामाजिक समता व समरसता वर्षानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्याचाही निर्णय घेतला आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृ्ती देण्यात येणार आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray : राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य; उद्या मराठी पुरस्कार घेताना ‘भैय्या’ दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने आज घेतला. विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे येथे केंद्रीय विद्यालयासाठी याच निर्णयाने जागा देण्यात आली. आता राज्यात केंद्रीय विद्यालये उभारण्यासाठी गती येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

Regional dynasticism

बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!

प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!, हेच राजकीय चित्र पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पांडिचेरी या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मधून समोर आले.

KEM

KEM : ‘केईएम’चे नामांतर होणार; मुंबई मनपा प्रशासनाचा हिरवा कंदील; ठाकरे शिवसेनेच्या विरोधानंतरही लोढांच्या मागणीला यश

मुंबई महानगरपालिकेच्या ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ (केईएम) या ब्रिटीशकालीन रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला आता पालिका प्रशासनाने अधिकृतपणे हिरवा कंदील दाखवला आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेला हा प्रस्ताव आरोग्य समितीच्या मंजुरीनंतर पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. आयुक्तांनी याला संमती दर्शवल्यामुळे आता हे रुग्णालय ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ या नावाने ओळखले जाईल.

Police Force

बंगालमध्ये निवडणुकीनंतरही केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपन्या तैनात राहणार; CAPF च्या महासंचालकांचे ट्विट; मोठ्या कारवाईचे संकेत!!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा केंद्रीय पोलीस बलाच्या 500 कंपन्या तैनात राहतील, अशा आशयाचे ट्विट CAPF अर्थात सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे महासंचालक जी. पी. सिंग यांनी आज केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतले मतदान संपण्यापूर्वीच पश्चिम बंगाल मध्ये अत्यंत मोठ्या कारवाईचे संकेत देखील मिळाले.

BJP

BJP : भाजपने म्हटले- ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय, ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांनी जागा अडवू नये

उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.

NSE

NSE : NSE मध्ये 2 कोटी गुंतवणूकदारांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; उत्तर प्रदेश दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या स्थानी

बाजारातील चढ-उतार आणि अपेक्षेपेक्षा कमी परतावा असूनही National Stock Exchange of India (NSE) मध्ये गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. ज्यातून भारतीय भांडवली बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांचा मजबूत सहभाग दिसून येतो.

उद्धव ठाकरेंना उरली नाही संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज; अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी!!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संसदीय राजकारणातून माघार घेतली. त्यांना शरद पवारांसारखी संसदीय राजकारणाची क्रेझ आणि गरज राहिली नाही.

ATS Reports

ATS Reports : धर्म विचारला, कलमा म्हणायला लावला, मुंबईत 2 सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला; ATS ने म्हटले-ISIS ची कागदपत्रे मिळाली

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात घडलेल्या चाकूहल्ला प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला साधा गुन्हा वाटणाऱ्या या घटनेचा तपास आता दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीच्या घरातून काही संशयास्पद आणि कट्टर विचारसरणीशी संबंधित साहित्य सापडल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ गुन्हेगारी नव्हे, तर व्यापक सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात आहे.

महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर; १०००० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक, १५०००० रोजगार संधींची निर्मिती

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विश्वात आज महाराष्ट्राने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण २०२६ जाहीर केले. यातून राज्यात दहा हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि दीड लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना सज्ज; दहावा उमेदवार उतरवण्याची रणनीती

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होत असताना उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह वाढत असतानाच, शिंदे गटाकडून मोठा राजकीय डाव टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दहावा उमेदवार उभा करण्याचे संकेत दिल्याने या निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Fadnavis

Fadnavis : फडणवीसांनी टोचले गायकवाडांचे कान, पानसरेंनी 1979 मध्ये लिहिलेल्या पुस्तकावर वाद उकरून काढणे असंवेदनशील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांवर सध्या निरर्थक वाद सुरू असल्याचा असल्याचा दावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सध्या निरर्थक वाद सुरू आहे. या देशात छत्रपती शिवरायांचा अवमान कुणीच करू शकत नाही. शिवाजी कोण होता? हे पुस्तक 1979 साली लिहिण्यात आले. त्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांना भिडायचे हे शुद्ध असामाजिक व असंवदेनशील कृत्य आहे, असे ते म्हणालेत.

Madhavi naik

Madhavi naik : भाजपकडून विधान परिषदेसाठी 5 जणांची नावे निश्चित:निष्ठावंतांना कौल; विवेक कोल्हे, प्रमोद जठार, माधवी नाईकांसह सुनील कर्जतकरांना संधी

येत्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीने मंजुरी दिल्यानंतर, पाच मुख्य जागांसाठी आणि एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव आणि अहिल्यानगरमधील युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात