महिला डॉक्टर, नर्सला मारहाण प्रकरणी कारवाईचा बडगा; नगरसेवक रमेश म्हात्रे तडीपार

विशेष प्रतिनिधी

डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या तीन साथीदारांची आधारवाडी कारागृहातून जामिनावर सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कडक अटी आणि शर्तींसह त्यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, पोलिसांकडून आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कारागृहातून बाहेर पडताच रमेश म्हात्रे राज्याबाहेर रवाना झाले. ते गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान रमेश म्हात्रे यांनी उच्च न्यायालयाकडे, “मला महाराष्ट्राबाहेर ठेवा, पण जामीन द्या,” अशी विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्यांना महाराष्ट्राबाहेर राहण्याची अट घातली आहे.



आठवड्यातून तीन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे यांना गोव्यात राहावे लागणार आहे. तसेच गोव्यातील अंजुना पोलिस ठाण्यात आठवड्यातून तीन वेळा हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील म्हात्रे यांच्यासह तीन पुरुष आरोपींना जामीन मिळाला आहे. मात्र, महिला आरोपीला अद्याप न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. ती सध्या आधारवाडी कारागृहात असल्याची माहिती आहे.

तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने पोलिसांना तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर आवश्यक पुरावे गोळा करून तपासाचा अहवाल लवकरात लवकर न्यायालयासमोर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. पोलिसांकडून आरोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया स्पष्ट होणार आहे.

Doctor, nurse assault case: Corporator Ramesh Mhatre barred from entering Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात