विशेष प्रतिनिधी
धाराशिव : राज्यात महायुतीचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे सोमवारी मध्यरात्री शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल मोटे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या घटनेत दोन्ही गटांकडून दगडफेक झाल्याचा आरोप असून, सुमारे 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. Tanaji Sawant-Rahul Mote
तेरखेडा गावात झालेल्या या राड्यात इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थारसह अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयाचा जल्लोष करताना तानाजी सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दुसरीकडे, सावंत समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावत विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवामुळे विरोधकांकडून विनाकारण वाद निर्माण केला जात असल्याचा दावा केला आहे.
शिवसेना कार्यकर्त्यांनी राहुल मोटे यांच्या सांगण्यावरूनच हा प्रकार घडल्याचा आरोप केला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांची तोडफोड करून आमच्यावर खोटे आरोप केल्याचा प्रतिदावाही केला आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल न झाल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App