शूटिंग सेटवरील अन्नाची गुणवत्ता तपासा; राष्ट्रवादीची तुकाराम मुंढेंकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार, तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत तसेच त्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत भेट घेतली.

या बैठकीत राज्यातील विविध चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्राप्त होत असलेल्या तक्रारी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न साठवणूक व वितरणाची पद्धत, तसेच संबंधित उत्पादन संस्था व केटरिंग सेवा पुरवठादारांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.



शिष्टमंडळाने चित्रीकरण स्थळांवर विशेष तपासणी मोहीम राबविणे, अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करणे, निकृष्ट व अस्वच्छ अन्न पुरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे तसेच कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्य सुरक्षेसाठी नियमित निरीक्षण व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी तुकाराम मुंढे यांनी शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन पुढील आठवड्यात आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कलाकार व तंत्रज्ञांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आवश्यक ती पावले उचलेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील,नितीन धावणे, अभिनेत्री अपेक्षा चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.

Memorandum submitted to Tukaram Mundhe regarding food quality on film shooting sets; NCP demands an inspection!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात