धर्मांतर केल्यास ‘अनुसूचित जाती’ (SC) दर्जा आणि आरक्षण संपणार; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली फेरविचार याचिका!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : धर्मांतर करून मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.

भारतीय संविधानाच्या कलम ३४१ (Order 1950) मधील तरतुदीनुसार, अनुसूचित जातीचा (SC) दर्जा केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातील व्यक्तींनाच अनुज्ञेय आहे. या धर्मांव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म (उदा. ख्रिश्चन किंवा मुस्लिम) स्वीकारल्यास संबंधित व्यक्तीचा SC दर्जा रद्द होईल, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

  • मुख्य मुद्दे आणि परिणाम :

आरक्षणाचे लाभ बंद : धर्म परिवर्तन केल्यास अनुसूचित जातीसाठी मिळणारे शैक्षणिक, नोकरीतील आणि राजकीय आरक्षण तसेच इतर सर्व शासकीय योजनांचे लाभ पूर्णपणे बंद होतील.

संविधानिक चौकटीवर शिक्कामोर्तब : सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील फेरविचार याचिका फेटाळून लावत राज्यघटनेतील मूळ तरतूद कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

या निकालाने धर्मांतर करणाऱ्या रॅकेटला देखील मोठा फटका दिला. कारण अनुसूचित जातीच्या लोकांना तुम्ही धर्मांतर केले, तरी तुमचे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे लाभ जाणार नाहीत, अशी लालूच दाखवून धर्मांतर केले जाते, त्याला आता सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल देऊन चाप लावला.

‘Scheduled Caste’ (SC) status and reservation to be lost upon religious conversion; Supreme Court dismisses review petition!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात