नितेश राणेंनी केले तुकाराम मुढेंचे कौतुक, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

पुणे : प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचाही हाच प्रयत्न आहे की, सर्वांनी नियमांचे पालन करून काम करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे काही वेगळे करत नसून, ते फक्त कायदा, नियम आणि जीआरचे पालन करत आहेत, अशा प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच आज महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे, असे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊत यांनी राजकीय लायकी आणि औकातीप्रमाणे वक्तव्य करावे. ज्यांच्या पक्षाचे आज महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतेही अस्तित्व राहिले नाही. जे बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत. त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये, अशी टीका राणे यांनी राऊतांवर केली. लोकमान्य टिळक कुटुंबाने अमित शाह साहेबांना मान दिला आहे. तो विचार पूर्वक दिलेला आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे या भांडुपच्या देवानंदची लायकी, याचा विचार करूनच राऊतांनी पुढे बोलावे असेही राणे म्हणाले.



अमित शाह हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, यावर देखील राणे यांनी प्रतिक्रिया दिली. जंतर-मंतरच्या जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलली होती. काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत चुकाच काढायच्या आहेत. काँग्रेसच्या काळात ‘नीट’ चे पेपर फुटणे असो किंवा लोकांवर अमानुष लाठीहल्ला होणे असो, या गोष्टींचाही हिशोब घ्यावा लागेल. राहुल गांधी ज्या पद्धतीने लोकसभेत वैयक्तिक द्वेष दाखवून भाषणे करत आहेत, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही, असे राणे म्हणाले.

कॉकरोच पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांना धमकी आली आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणालाही धमकी आली असेल, तर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार आणि पोलिसांची आहे. अधिकृत तक्रार करावी, पुरावे द्यावेत. मीडियासमोर बोलण्यापेक्षा थेट पोलीस ठाण्यात जावे. पोलीस नक्कीच योग्य ती कारवाई करतील.

Nitesh Rane praised Tukaram Mudhe, said…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात