राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांचं मौन सुटलं; NEET आंदोलन, Gen Z आणि नवीन पटनाईकांवर थेट भाष्य

विशेष प्रतिनिधी

भुवनेश्वर : NEET पेपर लीक प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी त्यांनी प्रथमच या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले. विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही जणांनी ‘Gen Z’ची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. Dharmendra Pradhan

भुवनेश्वर येथील जीएम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याबाबतही भाष्य केले. मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचे नव्हते. देशातील तरुणांचे भविष्य आणि त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, असा दावाही त्यांनी केला.

‘Gen Z भारताला विश्वगुरू बनवेल’

Gen Z पिढीबाबत धर्मेंद्र प्रधान यांनी सकारात्मक भूमिका मांडली. “Gen Z ही आपल्या देशातीलच मुले आहेत. त्यांच्याशी माझी कोणतीही वैयक्तिक अडचण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या तरुण पिढीच्या स्वतःच्या आकांक्षा आहेत आणि भविष्यात भारताला विश्वगुरू बनवण्यात Gen Z महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रधान म्हणाले. मात्र, विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही लोकांनी या पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला.



NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा

NEET पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांची आंदोलने झाली होती. दिल्लीतील जंतर-मंतरवरही आंदोलन तीव्र झाले होते. या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी प्रथमच या विषयावर सार्वजनिकपणे आपली भूमिका मांडली आहे.

‘मला मागे जाण्यास सांगितले तरी परत येत राहीन’

दरम्यान, रायराखोल येथील दुसऱ्या एका कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

विमानतळाबाहेर बीजेडीच्या युवा आणि विद्यार्थी कार्यकर्त्यांनी **‘धर्मेंद्र प्रधान गो बॅक’**च्या घोषणा देत आंदोलन केले होते. या निदर्शनांवर प्रतिक्रिया देताना प्रधान यांनी, “मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. तुम्ही मला मागे जाण्यास सांगितले तरी मी परत येत राहीन,” असे म्हटले.

तसेच, “मी ओडिशाच्या जनतेची मान खाली घालावी असे कोणते काम केले आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नवीन पटनाईक आपल्याला ओडिशासाठी ‘कलंक’ ठरवण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी तरुणांचा वापर करून राजकीय निदर्शने घडवून आणली जात असल्याचा आरोपही धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

Dharmendra Pradhan breaks his silence after resignation.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात