SSC HSC Exam Date : दहावी बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; जाणून घ्या वेळापत्रक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन, सराव आणि परीक्षेपूर्व तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. SSC HSC Exam Date

बारावीची परीक्षा कधीपासून?

इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्धात ‘एचएससी’ बोर्डाची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 ला सुरू होणार आहे. 16 मार्च 2027 पर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत.



दहावीची परीक्षा कधीपासून?

माध्यमिक शालान्त प्रमाणापत्र म्हणजे ‘एसएससी’ बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून, 11 मार्च 2027 पर्यंत घेण्यात येणार आहे. तर 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027 च्या कालावधीत दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.

सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर होणार?

मंडळाने सध्या परीक्षांच्या मुख्य तारखा जाहीर केल्या आहेत. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम वेळापत्रक अधिकृत माध्यमातून तपासून अभ्यासाचे नियोजन करावे, सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांवरील वेळापत्रकांवर अवलंबून न राहू नये, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव आणि उजळणीसाठी उपलब्ध वेळेचे नियोजन करता येणार आहे.

Dates for 10th and 12th-grade exams announced

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात