विहिरीत पडला दुर्मीळ ब्लॅक पँथर! वनविभागाच्या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे पिल्लाला जीवदान; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून टीमचं कौतुक!

विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी ; रत्नागिरी जिल्ह्यातून वन्यजीव प्रेमींसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या म्हणजेच ब्लॅक पँथरच्या पिल्लाला वनविभागाने अत्यंत धाडसाने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिलं आहे. black panther

या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर राज्याचे मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रेस्क्यू मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विशेष कौतुक केलं.

माध्यमांशी बोलताना सामंत म्हणाले की, ब्लॅक पँथर हा अत्यंत दुर्मीळ वन्यप्राणी आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, वनविभागाने दोन्ही वेळेस या प्राण्यांना सुरक्षित वाचवलं आहे. त्यामुळे वनविभागाची रेस्क्यू टीम महाराष्ट्रात नंबर वन असल्याचं त्यांनी म्हटलं.


गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विशेष म्हणजे, जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचंही त्यांनी कौतुक केलं. आक्रमक वन्यप्राण्यांना अत्यंत सक्षमपणे हाताळत त्यांचा जीव वाचवणं ही अभिमानास्पद बाब असल्याचं सामंत म्हणाले.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान ना कोणत्या नागरिकाला इजा झाली, ना त्या बिबट्याच्या पिल्लाला कोणतीही हानी पोहोचली. त्यामुळे वनविभागाच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आता या दुर्मीळ ब्लॅक पँथरच्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

R are black panther falls into a well

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात