विशेष प्रतिनिधी
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बुधवारी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नाट्याची पराकोटी पाहायला मिळाली. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेवर भाजपचाच अध्यक्ष बसवण्याचा दावा केला होता; मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला बाजूला सारत जिल्हा बँकेच्या सत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Satara District Central Bank
शिवसेना-राष्ट्रवादीची युती आणि जिल्हा परिषदेचा ‘वचपा’
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या सत्तासंघर्षात भाजपचे पारडे जड राहिले होते. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत त्या पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी मोर्चेबांधणी करत भाजपचे नेते तथा आमदार जयकुमार गोरे यांना याद्वारे मोठा शह दिल्याचे बोलले जात आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया: “कोणतीही निवडणूक अंतिम नसते”
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बाहेर आलेल्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. ”आता सातारा जिल्हा बँकेवर महायुतीचा अध्यक्ष झाला आहे. नाराजीचा विषय नाही, ज्यांचं बहुमत आहे त्यांचा अध्यक्ष झाला आहे. कोणी कशाचा वचपा काढला हा आजचा विषय नाही, ती निवडणूक आम्ही वेगळी लढलो होतो आणि ही निवडणूक वेगळी होती,” असे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी, “मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे भाजपचा अध्यक्ष व्हावा अशी अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. उदयसिंह उंडाळकर यांना चेअरमन म्हणून माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत,” असे म्हटले. मात्र, असे असले तरी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारे सूचक विधान करताना त्यांनी शेवटी “‘आगे आगे देखो होता है क्या’…” असा इशाराही दिला.
सहकार क्षेत्रावर महायुतीमधील पक्षांचे वर्चस्व
या निवडणुकीत भाजपला बाजूला सारले गेले असले, तरी अध्यक्षपदी निवड झालेले उदयसिंह पाटील-उंडाळकर (स्व. विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र) आणि उपाध्यक्षपदी निवड झालेले दीपक चव्हाण यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App