पानटपऱ्यांवर पोलिसांची नजर का? मुंबईत महिनाभरात तब्बल १,४९७ ठिकाणी कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियान अधिक तीव्र केले आहे. अंमली पदार्थांची निर्मिती, तस्करी, पुरवठा आणि विक्रीला आळा घालण्यासोबतच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर कारवाई केली जात आहे. या अभियानाचा भाग म्हणून जुलै २०२६ मध्ये मुंबईतील तब्बल १,४९७ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.Mumbai Police Crack Down

महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती आणि जनजागृती अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबई शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करणे, तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवणे आणि नागरिकांच्या सहभागातून नशामुक्त समाज निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात उत्तर आणि मध्य प्रादेशिक विभागात प्रत्येकी ४८० पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय दक्षिण प्रादेशिक विभागातील १९९, पूर्व प्रादेशिक विभागातील १७३, तर पश्चिम प्रादेशिक विभागातील १६५ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.



शाळा-महाविद्यालयांच्या परिसरावर विशेष लक्ष

शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या अनधिकृत पानटपऱ्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होऊ नये तसेच विद्यार्थी आणि तरुणांना व्यसनाच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी सातत्याने तपासणी आणि कारवाई केली जात आहे.

केवळ कारवाईपुरतेच अभियान मर्यादित न ठेवता नशेच्या दुष्परिणामांबाबत नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. व्यसनमुक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

मुंबईतील अनधिकृत पानटपऱ्यांवर होत असलेली कारवाई ही अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीला आळा घालण्याच्या व्यापक मोहिमेचा एक भाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

umbai Police Crack Down on Drugs: 1,497 Unauthorized Paan Shops Removed in July

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात