विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार विषय आणि पदांची पसंती उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच पोर्टलवर माहिती व्यवस्थित दिसत नसणे आणि OTP उशिरा मिळणे, अशा समस्याही समोर आल्या आहेत.
राज्यात सुमारे 30 हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर उमेदवारांना उपलब्ध पदांसाठी पसंतीक्रम नोंदवायचा आहे. मात्र मोठ्या संख्येने उमेदवार एकाच वेळी पोर्टलवर लॉगिन करत असल्याने वेबसाइटवर लोड वाढत आहे. परिणामी OTP मिळण्यास विलंब होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत वाढवली
शिक्षण विभागाने सुरुवातीला उमेदवारांना 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत पसंतीक्रम नोंदवून लॉक करण्याची मुदत दिली होती. मात्र पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि वाढता लोड लक्षात घेऊन ही मुदत आता 13 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मात्र, केवळ दोन दिवसांची मुदतवाढ पुरेशी नसल्याचे उमेदवार आणि शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांना प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे किमान आणखी एक आठवड्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिक्षण विभागाने तांत्रिक अडचणी मान्य केल्या
पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम भरताना उमेदवारांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींची शिक्षण विभागानेही दखल घेतली आहे. पोर्टलवर मोठ्या प्रमाणात उमेदवार लॉगिन करत असल्यामुळे OTP मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 76,394 मुलाखतीशिवाय आणि 56,206 मुलाखतीसह उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत.
OTP येत नसेल तर काय करावे?
शिक्षण विभागाने उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
उमेदवारांना दिलासा मिळणार का?
शिक्षक भरती प्रक्रिया 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाल्याने उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र आता पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने 13 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली असली तरी तांत्रिक अडचणी लक्षात घेता आठवडाभराची अतिरिक्त मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. त्यामुळे शिक्षण विभाग याबाबत पुढे काय निर्णय घेतो, याकडे शिक्षक भरतीच्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App