पुण्यात उद्या तिरंगा रॅली; डेक्कन, एफसी रोडसह प्रमुख मार्गांवर वाहतूक बदल

विशेष प्रतिनिधी 

पुणे : तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. दुपारी २ वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत किंवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

तिरंगा रॅली ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक या मार्गावरून जाणार आहे. रॅलीमुळे डेक्कन आणि फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, खंडोजीबाबा चौक ते गरवारे चौक या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात येणार आहे.

स्वारगेटहून विद्यापीठाच्या दिशेने

स्वारगेटहून पुणे विद्यापीठाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, ना. सी. फडके चौक, मंगिरबाबा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

स्वारगेटहून खडकीकडे जाणाऱ्यांसाठी पर्यायी मार्ग

स्वारगेटहून खडकी किंवा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अण्णाभाऊ साठे चौक, पूरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक हा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.

खंडोजीबाबा चौक परिसरातील वाहतूक

खंडोजीबाबा चौकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनी नळ स्टॉप, पौड फाटा, आठवले चौक आणि लॉ कॉलेज रोड या मार्गाचा वापर करावा. तसेच अलका टॉकीज चौक, केळकर रस्ता, नदीपात्र रस्ता, शनिवारवाडा आणि गाडगीळ पुतळा हा पर्यायी मार्गही उपलब्ध राहणार आहे.



सेनादत्त चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी बालशिवाजी म्हात्रे पूल मार्गाचा वापर करावा. तर शामराव गांजवे चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी पत्रकार भवन, एस. एम. जोशी पूल आणि गरवारे कॉलेजमार्गे पुढे जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

सेवासदन चौकाकडून येणाऱ्या वाहनांनी आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गरवारे चौक ते चाफेकर चौक वाहतूकही प्रभावित

रॅलीमुळे गरवारे चौक ते चाफेकर चौक या भागातील वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वाहनचालकांनी शेलारमामा चौक, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड आणि विद्यापीठ चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

याशिवाय भांडारकर रोड, बीएमसीसी रोड, चतुःशृंगी रोड, मॉडेल कॉलनी रोड, लॉ कॉलेज रोड आणि सेनापती बापट रोड हे मार्गही पर्याय म्हणून उपलब्ध राहणार आहेत.

रॅलीमुळे डेक्कन, एफसी रोड, गरवारे कॉलेज, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tiranga Rally to Trigger Traffic Diversions in Pune on August 11

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात