मुंबईतील मोकळ्या जागांवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

Aaditya Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवाप्रमुख तथा वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील विविध मोकळ्या जागांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी सोमवारी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. Aaditya Thackeray

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी मुंबईतील खुल्या जागांचा लढा मोठा असल्याचे सांगत म्हाडा, एमएमआरडीए तसेच महापालिकेच्या भूखंडांबाबत सरकारच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले.

“हा लढा थेट मुख्यमंत्र्यांबरोबर सुरू आहे. मुख्यमंत्री स्वतः मित्रपक्ष आणि भाजपच्या आमदारांना मुंबईतील १६ एकर मोकळ्या जागा फुकटात देत आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.


 


अंधेरीतील एका भूखंडाचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले की, सुमारे ₹400 कोटी किंमतीचा प्लॉट प्रत्येक वर्षासाठी अवघ्या ₹21 लाखांमध्ये देण्यात आला आहे. तसेच म्हाडाचे दोन भूखंड विनामूल्य देण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला. या निर्णयांविरोधात शिवसेना (UBT) मोठे आंदोलन उभारणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

“आम्ही मोर्चाची तयारी सुरू केली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुंबईतील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी होतील. मोर्चाची तारीख लवकरच जाहीर करू,” असे त्यांनी सांगितले.

वांद्रे रिक्लेमेशन येथील नेव्हिल डिसूजा फुटबॉल मैदानाच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले.

या मैदानाचे क्रीडांगणाचे आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावाविरोधात न्यायालयातून दिलासा मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पुढील सुनावणीपर्यंत महापालिकेने कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी भाजपवर आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, मुंबईतील मोकळ्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. १६ एकर जागा असो, फुटबॉल टर्फ असो किंवा प्रभादेवीतील मोकळ्या जागा असोत, अनेक मैदानं बिल्डर आणि कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव भाजपने आखला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

“हा डाव आम्ही हाणून पाडणारच. त्यासाठी कितीही मोठे आंदोलन करावे लागले तरी आम्ही करू,” असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

Aaditya Thackeray Targets BJP Over Mumbai’s Open Spaces

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात