रांचीतील विद्यार्थी आंदोलनावरून राजकारण तापलं; संजय निरुपमांनी राहुल गांधींना थेट घेरलं, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

मुंबई : रांचीतील विद्यार्थी आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. Sanjay Nirupam

रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडत झारखंड विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ धडक दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर निरुपम यांनी तो व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘रांचीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, काँग्रेस मात्र गप्प’

संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या कथित दुटप्पी भूमिकेवर टीका केली. दिल्लीत विद्यार्थी प्रश्नांवरून काँग्रेस आणि राहुल गांधी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतात, मात्र झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी असताना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिस कारवाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस संसदेतही आक्रमक होत असल्याचे निरुपम यांनी म्हटले. मात्र, झारखंडमधील आंदोलनावर काँग्रेसकडून अपेक्षित भूमिका घेतली जात नसल्याचा दावा त्यांनी केला.

‘गरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय’

झारखंड लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला. याचा फटका गरीब, सामान्य आणि आदिवासी विद्यार्थ्यांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले.

परीक्षा आणि भरती प्रक्रियेत वशिलेबाजी होत असल्याचा आरोप करत, काही प्रभावशाली लोक आपल्या नातेवाईकांना पुढे आणून नोकऱ्या मिळवून देत असल्याचा दावाही त्यांनी केला.



राहुल गांधींवरही निशाणा

राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी केवळ औपचारिक संवाद साधल्याची टीका निरुपम यांनी केली. विद्यार्थी आंदोलन सुरू असतानाही राहुल गांधी अद्याप रांचीला गेलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला.

झारखंड सरकारकडून विद्यार्थ्यांशी निर्णायक चर्चा झालेली नाही आणि त्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही, असेही निरुपम यांनी म्हटले.

‘खांदा विद्यार्थ्यांचा, बंदूक काँग्रेसची!’

काँग्रेसला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची खरोखर चिंता नसून त्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.

“खांदा विद्यार्थ्यांचा आणि बंदूक काँग्रेसची,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर केंद्र सरकारविरोधात राजकीय मोहीम उभारण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसला विद्यार्थ्यांची खरोखर काळजी असेल, तर त्यांनी तातडीने झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी निरुपम यांनी केली.

Sanjay Nirupam Targets Rahul Gandhi Over Ranchi Protest

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात