मैदान मिळणार, पण ‘ही’ अट पाळावी लागणार! ढोल-ताशा पथकांसाठी पुणे महापालिकेचा नवा मुद्दा

विशेष प्रतिनिधी

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांच्या सरावासाठी पुणे महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. मात्र, या जागांचा वापर करण्यासाठी रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे व शुल्क आकारावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. सरावासाठी महापालिकेची परवानगी बंधनकारक करून अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या शेड आणि मंडपांमुळे होणाऱ्या अतिक्रमणालाही आळा घालावा, असे त्यांनी म्हटले आहे. dhol-tasha rehearsals

पुणे शहरात महापालिकेची अनेक मैदाने आणि आरक्षित मोकळ्या जागा आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी विविध ढोल-ताशा पथकांकडून या जागांचा सरावासाठी वापर केला जातो. मात्र, काही ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच मंडप किंवा शेड उभारून दोन ते तीन महिने सराव केला जात असल्याचे बालगुडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना ध्वनिप्रदूषणासह अन्य समस्यांना सामोरे जावे लागते.



सणस मैदान, नेहरू स्टेडियम परिसर तसेच महापालिकेच्या इमारती आणि मोकळ्या जागांमध्ये काही ढोल-ताशा पथके अनधिकृतपणे सराव करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यंदाही शहरातील विविध भागांमध्ये प्रशासनाची परवानगी न घेता शेड उभारून सराव सुरू करण्यात आल्याचे बालगुडे यांनी सांगितले.

दरम्यान, महापौर मंजुषा नागपूरे यांनी ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच परवानगी प्रक्रियेसाठी एक खिडकी योजना राबवावी, तसेच सरावाच्या ठिकाणी वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. या सुविधांना आपला कोणताही आक्षेप नसल्याचे बालगुडे यांनी स्पष्ट केले.

मात्र, महापालिका पथारी व्यावसायिकांसह विविध घटकांना सार्वजनिक जागांचा वापर करण्यासाठी सशुल्क परवानगी देते. त्यातून महापालिकेला महसूल मिळतो. त्याचप्रमाणे ढोल-ताशा पथकेही व्यावसायिक स्वरूपात कार्यरत असून, त्यांच्याकडून वादनासाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे महापालिकेच्या जागांचा वापर करणाऱ्या पथकांकडूनही नियमानुसार शुल्क आकारणे आवश्यक असल्याचे बालगुडे यांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ढोल-ताशा पथकांना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम मिळतात आणि त्यातून त्यांना उत्पन्नही मिळते. त्यामुळे महापालिकेच्या मैदानांचा सरावासाठी वापर करणाऱ्या पथकांकडून रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे आणि शुल्क आकारावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात मागील वर्षी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. यंदाही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच पुन्हा निवेदन देण्यात येणार असल्याचे संजय बालगुडे यांनी सांगितले.

dhol-tasha rehearsals; charge fees as per ready reckoner

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात