नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के; घरातील भांडी पडली, नागरिक भयभीत, प्रशासन अलर्ट

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Earthquake

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत होते. मात्र, शनिवारी रात्री प्रथमच नाशिक शहरातील अनेक भागांमध्येही हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील अनेक भागांना हादरे

नाशिक शहरातील इंदिरानगर, मेन रोड, पंचवटी, हिरावाडी आणि पाथर्डी पाडा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातही हे हादरे जाणवले.



भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही ठिकाणी घरातील भांडी पडल्याच्या घटना घडल्या. अचानक जाणवलेल्या हादऱ्यामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडल्याचेही सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागात काही दिवसांपासून धक्के

नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे छोटे-मोठे धक्के जाणवत आहेत. कसारा घाटापासून रामशेत किल्ल्याच्या परिसरापर्यंत काही भागात भूकंपाचे हादरे जाणवल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शहरातही धक्के जाणवल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल असल्याचे सांगितले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Earthquake tremors felt in nashik city

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात