आपला महाराष्ट्र

Supriya Sule

सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच त्यात मध्येच राष्ट्रवादीच्या ऐक्याचा खोडा; सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पुढे सरकवायचा डाव!!

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच, त्यात मध्येच राष्ट्रवादीचा ऐक्याचा खोडा घालायचा आणि सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे, असा डाव राष्ट्रवादीतले काही नेते खेळत असल्याचे उघड झाले.

Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, मंत्री नरहरी झिरवाळ यांची मागणी; NCP नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी थेट सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. झिरवाळ यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Sushma Andhare

Sushma Andhare : दृश्यमानता कमी तर CCTV फुटेज इतके स्पष्ट कसे? राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी मौन का बाळगले? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर त्यांचे विमान लँड होत असतानाच भीषण अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. विमान लँड करत असताना दृश्यमानता कमी असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. परंतु, यावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शंका उपस्थित केली आहे.

अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!; नेमका अर्थ काय??

अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!, हे राजकीय वास्तव अजितदादांना निरोप देण्याच्या दिवशी समोर आले.

अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??

अजितदादांचा राजकीय वारस एकटे शरद पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??, हा खरं तर “सवालच” नाही.

Sunetra Pawar

अजितदादांना निरोप देताच राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर; सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आले विशिष्ट निर्णायक वळणावर!!

उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप देताच त्यांच्या राजकीय वारसाचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांचे राजकीय भवितव्य आता आणि विशिष्ट निर्णयाक वळणावर आले आहे.

आमच्या बारामतीकरांचा माज गेला; दादांच्या आठवणी सांगताना कार्यकर्त्याचे शब्द!!

आम्ही बारामतीकर आहोत, असा आम्हाला माज असतो पण दादा गेले आणि आमच्या बारामतीकरांचा माज गेला!!, अशा शब्दांमध्ये बारामतीतल्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या आठवणी सांगितल्या. या संदर्भातली बातमी सकाळने दिली.

अजित पवारांच्या exit मुळे ZP निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल नाही; ठरलेल्या तारखेलाच निवडणुका!!

अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही. कारण नियमांमध्ये तशी तरतूद नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाने केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असताना सुद्धा दादा त्यांना “सीएम साहेब” म्हणायचे; त्यातून दादांना काय सुचवायचे होते??

आम्ही दोघे मंगळवारी (दि. २७) मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र होतो. पाठोपाठ मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठक माझ्या कक्षात झाली

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवार म्हणाले- महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान; अजितदादांचा मृत्यू हा निव्वळ अपघात, कृपा करून इथे राजकारण आणू नये

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावुक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा निव्वळ एक अपघात असून यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट करतानाच, शरद पवार यांना शोक अनावर झाल्याने बोलणेही कठीण झाले होते. खरे तर आज मी प्रसारमाध्यमांसमोर येणार नव्हतो, असे नमूद करत त्यांनी आपल्या पुतण्याला गमावल्याचे दुःख अत्यंत जड अंतःकरणाने व्यक्त केले.

Eknath Shinde

Eknath Shinde : अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; म्हणाले- मोठा भाऊ हरपला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे. हे डोंगराएवढे दुःख पचवण्याची क्षमता ईश्वराने त्यांना प्रदान करावी, असे ते म्हणाले.

CM Fadnavis

CM Fadnavis : शरद पवार म्हणाले- महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान; अजितदादांचा मृत्यू हा निव्वळ अपघात, कृपा करून इथे राजकारण आणू नये

अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत. ज्याच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा हे अतिशय संघर्षातून तयार झालेले अशा प्रकारचे नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राकरता आजचा दिवस अतिशय कठीण दिवस आहे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात, असे देखील फडणवीस म्हणाले.

Ajit Pawar Exit : “हा” निव्वळ विमान अपघात, राजकारण नको; संशयाचे मळभ भरलेल्या वातावरणात पवारांचे वक्तव्य

बारामती जवळ झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार कालवश झाले. या दुर्घटनेबद्दल देशात अनेकांनी संशयाचे मळभ निर्माण केले. संशयाने भरलेल्या या वातावरणात शरद पवारांनी एक वक्तव्य केले.

Ajitdada

अजितदादा म्हणे, भाजपची साथ सोडणार होते; ममता बॅनर्जींची संशय पेरणी किती खरी??, किती खोटी??

बारामतीच्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार कालवश झाले. त्यानंतर या अपघाताविषयी अनेकांनी अनेक संशय व्यक्त केले. पण त्या पलीकडे जाऊन पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी राजकीय संशय पेरणी केली

“बघतो”, “सांगतो”, हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हतेच, ते बोलायला रोखठोक आणि मनाने निर्मळ होते!!

आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे.

अजित पवारांचा आज दिवसभर कार्यक्रम काय होता??; बारामती तालुक्यात ते कुठे कुठे घेणार होते सभा??

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान सकाळी 8:15 ते 8:30 वाजेदरम्यान बारामती विमानतळाजवळ उतरण्याच्या तयारीत असताना शेजारच्या शेतात कोसळले. या भीषण विमान अपघातात काळाने महाराष्ट्राचा एक करारी, कामाचा मोठा झपाटा असलेला, रोखठोक भूमिका घेणारा नेता हिरवला. अजितदादांच्या विमानाचा मोठा स्फोट झाला. या मृत्यूने महाराष्ट्राला,

Ajit Pawar's exit

Ajit Pawar exit : एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भावना!!

एक दमदार आणि दिलदार मित्र गमावला अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये कालवश झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. आहे.

Ajit Pawar exit : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे सोडून सुनेत्रा पवारांचे नेतृत्व विकसित होईल??

बारामतीतल्या विमान अपघातात घडलेल्या अजित पवारांच्या अकाली exit नंतर महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड shock wave आली.

Ajit Pawar,

अजित पवारांच्या अकाली exit नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय??, सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाची कसोटी!!

बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोकलहर पसरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोरकेपणाची भावना आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि हजारो कार्यकर्त्यांना अश्रू आवरले नाहीत. सगळे शोक सागरात बुडाले.

अजित पवार : वादग्रस्त, पण अत्यंत कार्यक्षम नेत्याची अखेर!!

अजित पवार आपल्या राजकीय कर्मभूमीत बारामती मध्येच विमान अपघातात कालवश झाले. एक अत्यंत कार्यक्षम पण वादग्रस्त नेत्याची अचानक political exit झाली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला.

Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार बारामती जवळ विमान अपघातात कालवश; संपूर्ण महाराष्ट्राला धक्का!!, सहा जणांना काळाने हिरावले!!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामती जवळ विमान अपघातात कालवश झाले. सकाळी 8.45 वाजता झालेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल 40 वर्षे राजकीय मुशाफिरी करणारा नेता विमान अपघातात अचानक कालवश झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ देखील शोकात बुडाले.

Dy CM Ajit Pawar

Dy CM Ajit Pawar : बारामतीत भीषण विमान अपघात : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू, महाराष्ट्र हादरला

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विशेष विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Satara Gazetteer

Satara Gazetteer : ‘सातारा गॅझेटियर’ लवकरच लागू होणार; मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातील बैठकीत आरक्षणाचा आढावा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला.

Girish Mahajan

Girish Mahajan : अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका, प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. वाद चिघळल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरलो, असे स्पष्टीकरण दिले. आता यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अनावधानाने नाव घ्यायचे विसरलात, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

Bombay High Court

Bombay High Court : हवेची गुणवत्ता जाणून घेणे नागरिकांचा मूलभूत अधिकार; प्रदूषणाची सर्व आकडेवारी सार्वजनिक करण्याचे मुंबई HCचे आदेश

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता ढासळत चालल्याने मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेची नेमकी माहिती मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत, प्रदूषणाशी संबंधित सर्व आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात