TET Paper Leak Case : TET पेपरफुटी प्रकरण; पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

TET Paper Leak Case

विशेष प्रतिनिधी

मुंबई : TET Paper Leak Case   महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील जप्त करण्यात आले आहेत. TET Paper Leak Case

हे आरोपी परीक्षार्थींकडून मोठी रक्कम उकळून या प्रश्नपत्रिकांची विक्री करण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचून त्यांचा हा डाव उधळून लावला. भिवंडी पोलिसांच्या या कारवाईमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो परीक्षार्थींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षिततेचा आणि पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. TET Paper Leak Case



परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी समिती गठीत

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने तत्काळ पावले उचलली असून, राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ सभागृहात या संपूर्ण कारवाईची सविस्तर माहिती दिली. तसेच, भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पुढील टीईटी आणि इतर सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत करण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणाही दादा भुसे यांनी यावेळी केली.

बिहार-हरियाणातील तीन मुख्य आरोपींना अटक

भिवंडी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत टीईटी पेपरफुटी प्रकरणातील बिहार आणि हरियाणा येथील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजीव प्रयाग शाम (वय 45, रा. पाटणा-बिहार), आकाश कुमार स्वराज कुमार (वय 30, रा. पाटणा-बिहार) आणि धीरज बलराज सिंग (वय 28, रा. पानिपत-हरियाणा) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून आगामी टीईटी परीक्षेचे चार प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले असून, हे पेपर विकण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक व्यवहार होणार असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली आहे.

सभागृहात दादा भुसे काय म्हणाले?

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सभागृहात बोलताना म्हणाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही 2026 पेपर फुटीच्या प्रकरणी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील येथील दाखल गुन्हाबाबत निवेदन सादर करत आहे.

आरोपींकडून TET परीक्षेचे पेपर आढळून आले

दादा भुसे म्हणाले, TET परीक्षा दिनांक 28.06.2026 रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही लोक विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून TET परीक्षेचे पेपर आढळून आले. शिक्षण विभागाच्या वरिष्ठ आधुकाऱ्यांकडून खात्री केली असता सदर प्रश्नपत्रिका 28 तारखेला होणाऱ्या परीक्षेचे असल्याचे समोर आले.

दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई

पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, राजू प्रयाग चाव व इतर दोन यांच्याविरोधात दिनांक 27 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील 3 आरोपींना 27 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचे व्याप्ती लक्षात घेता एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याचा तपास सध्या सुरू असून बिहारला दोन पथके, हरयाणाला एक पथक दिल्लीला एक पथक रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणातील जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर मकोका लावण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

TET Paper Leak Case: Committee Formed to Conduct Future Exams Online

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात