विशेष प्रतिनिधी
ठाणे : बंडखोर खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा; तरीही शिंदे सेनेत कार्यकर्त्यांची भरती!!, असला प्रकार समोर आला. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ आणि धाराशिव मतदारसंघांमध्ये जाऊन संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या बंडखोर खासदारांची धुलाई केली. संजय राऊत यांनी त्या दोघांना शिव्यांची लाखोली वाहिली. तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन नेते शिवसेनेतली गळती रोखू शकले नाहीत.
नांदेड जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सकल मातंग समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुतीराव वाडेकर यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲड. राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडागळे, बाबुराव आंबेगावे, विष्णुराव गवळी, अरुण सूर्यवंशी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, बालाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेठे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मारुतीराव वाडेकर यांच्यावर महाराष्ट्र समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्याचा उल्लेख करत तुम्ही समाजाला एकत्र करा, समाजाला न्याय देण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे सांगितले. तसेच सामाजिक न्यायमंत्री, मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या सचिवांसोबत लवकरच बैठक घेऊन समाजाच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघचौरे तसेच नांदेड शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App