विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र शासनाने दिवाळीच्या तोंडावर महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. शनिवारी (३१ ऑक्टोबर) राज्यातील २४ अपर जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या तसेच पदोन्नतीसंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाशी संबंधित पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचाही या बदल्यांमध्ये समावेश आहे. शासन निर्णयानुसार, २०२५-२६ च्या अतिरिक्त निवडसूचीतील निवडश्रेणी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात येत आहे. या आदेशांमध्ये काही अधिकाऱ्यांना तातडीने नव्या पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर काहींना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे महसूल विभागासह विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होणार आहेत. दिवाळीपूर्वी जारी झालेल्या या आदेशांमुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात बदल्यांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
बदल्या आणि नियुक्त्या पुढीलप्रमाणे:
१) अण्णासाहेब दादू चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे ३१ ऑक्टोबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले. या रिक्त पदावर मुंबई येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी येथील रहिवासी आहेत.
२) प्रविण कृष्णा साळुंखे यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३) प्रशांत सुमंतराव पाटील यांची मंत्रालयात पणनमंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
४) बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांची परभणी येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५) जनार्दन पाटील लोंढे यांची नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात रोजगार हमी योजना (रोहयो) विभागाचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६) जितेंद्र दिनकरराव पाटील यांची वर्धा जिल्ह्यातील संजय तेली यांच्या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
७) ज्योती एकनाथ लाटे-कदम यांची अकोला येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
८) कल्याण दत्तू पांढरे यांची यवतमाळ येथे रिक्त होणाऱ्या अपर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
९) कीर्ती संदीप नलावडे यांची पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून नंदकुमार कोष्टी यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर बदली करण्यात आली आहे.
१०) संजय बाबुराव तेली यांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
११) मौसमी रावसाहेब चौगुले यांची छत्रपती संभाजीनगर येथे सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून बदली करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
१२) संजीव नारायण देशमुख यांची श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१३) श्रीरंग पांडुरंग तांबे यांची शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानात अपर जिल्हाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१४) उदय रामहरी किसवे यांची नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.
१५) विजयसिंह पांडुरंग पाटील यांना सहकारमंत्र्यांच्या कार्यालयात खाजगी सचिव म्हणून प्रपत्र बढती देण्यात आली आहे.
१६) विनय यशवंत गोसावी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची धुळे जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
१७) भिमराज रामराव दराडे यांची शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानातील अपर जिल्हाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून मुंबई उपनगरातील रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
१८) नंदकुमार माधव कोष्टी यांची महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
१९) तुकाराम देवराम हुलवळे यांची मुंबई सिडको येथून शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून रिक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
२०) संतोष मच्छिंद्र थिटे चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
२१) प्रविण रत्नाकर महिरे यांची चंद्रपूर येथे अपर जिल्हाधिकारी पदाच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
२२) पद्मश्री श्रीराम बैनाडे यांची महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
२३) वसुंधरा शिवाजी बारवे, पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त, यांची यशदामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२४) शुभांगी अनिल साठे, सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारी, यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगात उपसचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App