विशेष प्रतिनिधी
पुणे: शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला असून, किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २०) पुण्यात किमान तापमानाचा पारा ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. विशेष म्हणजे, पुण्याचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी नोंदविण्यात आले. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात गारठा अधिक जाणवत आहे.Pune turns chilly
शहर आणि परिसरात शुक्रवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मात्र, किमान तापमानात एकाच दिवसात सुमारे तीन अंश सेल्सिअसची घट झाली. दिवसा निरभ्र आकाशामुळे उन्हाचा अनुभव येत असला, तरी सूर्यास्तानंतर तापमानात घट होऊन थंडीचा प्रभाव वाढत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस हवामान प्रामुख्याने निरभ्र राहणार असून, तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘अकवान’ हे चक्रीवादळ अधिक शक्तिशाली झालं असून या चक्रीवादळाचा देशाच्या हवामानावर मोठा परिणाम जाणवतो आहे. हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर म्हणजे गंजाम जिल्ह्यातील गोपाळपूरजवळ धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होताना दिसत आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते माध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या असून आज शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एकीकडे राज्यात थंडी वाढण्याची अपेक्षा असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App