‘आमच्याकडे या, थेट मंत्रिपदाची संधी देतो!’ भरत गोगावलेंची शरद पवारांच्या आमदाराला राजकीय ऑफर!

Bharat Gogawale

विशेष प्रतिनिधी

सोलापूर:कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. केवळ पक्षात येण्याचे निमंत्रणच नव्हे, तर आमच्याकडे आल्यास मंत्रीपदही देऊ शकतो, असे जाहीर आश्वासन गोगावले यांनी जनतेसमोर दिल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.Bharat Gogawale



पंढरपुरातील कार्यक्रमात गोगावलेंची ‘आबा’ अभिजीत पाटलांना खुली ऑफर

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्निक शासकीय महापूजा संपन्न होणार असून, त्यासाठी शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार पंढरपूरमध्ये आले आहेत. याच दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या वंशजांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. गोगावले म्हणाले की, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देव उभा राहतो, पण ज्या वेळी देव अडचणीत आला त्या वेळी अभिजीत पाटील यांचे वंशज उभे राहिले, त्याबद्दल आबा तुम्हाला धन्यवाद; जर आमच्याकडे येणे झाले तर मंत्रीपदही देऊ शकतो, हे जमलेल्या जनतेसमोर सांगू शकतो.

अभिजीत पाटलांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात मोठ्या प्रमाणात वारकरी आणि विविध राजकीय पक्षांचे नेते दाखल झाले आहेत. अशा भक्तीमय वातावरणात मंत्री भरत गोगावले यांनी शरद पवार गटाच्या विद्यमान आमदाराला थेट सत्तेत सहभागी होण्याची आणि मंत्रीपदाची ऑफर दिल्याने सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता भरत गोगावले यांच्या या जाहीर ऑफरवर आमदार अभिजीत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देतात आणि काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bharat Gogawale Offers Ministerial Post to Sharad Pawar Faction MLA Abhijeet Patil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात