आमदार सुरेश धसांची तक्रार ठरली निर्णायक! कृषी विभागाचे उपसंचालक पत्नीसह ACB च्या जाळ्यात

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

पुणे : आमदार सुरेश धस यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कृषी विभागाचे उपसंचालक किरण शामराव जाधव आणि त्यांची पत्नी संगीता जाधव यांच्याविरोधात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. MLA Suresh Dhas

किरण जाधव हे सध्या सोलापूर येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) उपसंचालक तथा प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. जाधव दाम्पत्य पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील कुंदन पार्क येथे वास्तव्यास आहे. दोघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



एसीबीच्या माहितीनुसार, ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या तब्बल ३१ वर्षांहून अधिक कालावधीतील जाधव यांच्या उत्पन्नाची, मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत जाधव दाम्पत्याकडे तब्बल ४ कोटी ३७ लाख ७४ हजार ९३० रुपयांची ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे आढळल्याचा दावा एसीबीने केला आहे.

संगीता जाधव यांनी कथित बेहिशेबी मालमत्ता जमविण्यासाठी पतीला मदत केल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आमदार सुरेश धस यांच्या आरोपानंतर चौकशीला वेग

एप्रिल २०२५ मध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील परवान्यांशी संबंधित कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप केले होते.

Agriculture Deputy Director Kiran Jadhav, wife in ACB net following MLA Suresh Dhas’ complaint

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात