पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. देशाची अर्थव्यवस्था, डिजिटल क्रांती, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी मांडत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर भाष्य करत विरोधकांवरही टीका केली.
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील तथाकथित ‘अटी’बाबत सविस्तर खुलासा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी कर्जमाफी, शेतीसमोरील आव्हाने आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांवर भाष्य केले.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी मंजुरी प्रक्रियेत होणारा विलंब आता सहन केला जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीनंतर शालेय शिक्षण विभागाने शालार्थ आयडीसंदर्भात नवी आणि कठोर नियमावली लागू केली आहे.
राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 14 जून रोजी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय रणनीती, संघटनात्मक स्थिती आणि सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील गुटखा, तंबाखू आणि पानमसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता आक्रमक भूमिका घेतली आहे. गुटखा तस्करीमागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि कडक निर्देश दिले असून, यापुढे कारवाई केवळ टपरी चालक किंवा किरकोळ विक्रेत्यांपुरती मर्यादित राहणार नसून या काळ्या व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार आहे.
काँग्रेसमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होण्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्याऐवजी काँग्रेसवर निशाणा साधला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी मोठा गोंधळ उडाला. आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. माधव कुसेकर यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती इतकी तापली की दोन्ही आमदार एमडींच्या दिशेने धावून गेल्याचा दावा करण्यात येत असून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मध्यस्थी करावी लागली.
खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीची धडपड; यशवंत मार्गाने पवार काँग्रेस पुढे शरणागत!!, हीच राजकीय वस्तुस्थिती कालच्या घडामोडींमधून समोर आली.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षातील अंतर्गत राजकारणाची झलक पाहायला मिळाली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून पक्षश्रेष्ठींसमोर मंत्रिपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. क्रिकेटचे उदाहरण देत त्यांनी, “आम्ही कायम १२वे खेळाडूच राहणार का?” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही त्याला सूचक प्रतिसाद दिला आहे.
राज्यात प्रशासकिय सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या शिवाय दोन ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव देखील आहे. या संदर्भात अधिसूचना तातडीने प्रसिध्द करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.
स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने गुरुवारी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परिसरात मोठे आंदोलन केले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सहभागी झाले होते. शेकडो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि समर्थकांनी बॅनर, पोस्टर आणि घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाच्या विषयाला पुन्हा उकळी; पवारांच्या जखमेवर मीठ चोळी!!, हा प्रकार आज घडला
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पीटल जवळ एका वृद्ध व्यक्ती सरोश दस्तूर यांना परप्रांतीय वाहनचालकाने मारहाण केली होती. या मारहाण करणाऱ्या परप्रांतीय चालकावर ३०७ कलमअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. या पार्श्वभूमीवर आज त्यांच्याशी व्हिडीओ कॉल वरून संवाद साधला.
मुंबई, पुणे आणि नागपूरमधील महत्त्वाच्या सरकारी व संवेदनशील ठिकाणांना बॉम्बस्फोट घडवून उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने पाठवण्यात आलेल्या एका ई-मेलमध्ये मुंबई आणि पुण्याचे महापौर कार्यालय, नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय तसेच इतर काही संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा दावा करण्यात आला आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाजन यांच्यावर टीका करत, अशा विधानांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत शरद पवारांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील जनक्षोभ आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. मंगळवारी कोल्हापुरात हजारो शेतकरी, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत सरकारला इशारा दिला. “आमचे रक्त सांडले तरी चालेल, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला जाऊन आत्मचिंतन करावे, असा सल्ला दिल्यानंतर बन यांनी त्याला तीव्र प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ आता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापेक्षाही अधिक झाला आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी गेल्या 12 वर्षांत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यामुळे मोदींनी आत्मचिंतन करण्याची गरज नसून विरोधकांनीच आपल्या राजकारणाचा विचार करावा.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचे कौतुक करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
विधान परिषद निवडणुकीतील नाराजीचा सूर नुकताच शांत झाल्यानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला आहे. या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सत्तार यांनी यामागे कोणते राजकारण आहे हे सध्या सांगता येणार नसले तरी संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे स्पष्ट केले.
नवी दिल्लीत आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडी ही देशहितासाठी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून एकत्र आली असल्याचा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
राज्यात मे अखेरपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार राज्यातील सुमारे 56 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. महसूल आणि कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, अंतिम अहवालानंतर मदत जाहीर केली जाणार आहे.
अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 114 पदके जिंकत अव्वल स्थान पटकावले. समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद कामगिरी केली. हा प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा क्षण ठरला.
महाराष्ट्राच्या प्रशासकीय सोयीसाठी मंत्रालयातील विभाग वाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी नवी दिल्लीत जाऊन शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेतली; पण त्याचवेळी पवार कुटुंबीयांची राष्ट्रवादीवर वर्चस्व टिकविण्याची अयशस्वी धडपड दिसली!!
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राज्यसभा उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असला, तरी या निर्णयामागील राजकीय घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या जागेसाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव होते राज्याचे मंत्री छगन भुजबळ. शेवटच्या क्षणी समीकरणे बदलली आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांची निवड झाली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App