भाजप सोडा आणि महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री व्हा; विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर

विशेष प्रतिनिधी

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या व राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना भाजप सोडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, “तुम्ही भाजपमधून बाहेर पडलात तर महाराष्ट्राच्या पहिल्या ओबीसी मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण साथ मिळेल,” असेही त्यांनी म्हटले. Vijay Wadettiwar

पंकजा मुंडे यांनी अलीकडेच आपल्या राजकीय भवितव्याबाबत केलेल्या वक्तव्यांनंतर त्यांच्या राजकीय भूमिकेवर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंकजा मुंडे यांना पक्षात योग्य सन्मान किंवा न्याय मिळत नसल्याची भावना निर्माण झाली असेल. त्यांच्या कुटुंबाने भाजपसाठी दिलेल्या योगदानाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी अशा भावना व्यक्त केल्या असाव्यात, असे त्यांनी सांगितले.



वडेट्टीवार म्हणाले, “पंकजा मुंडे या राज्यातील प्रभावी ओबीसी नेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचार करण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडून ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे. अशा निर्णयाला आम्ही आणि काँग्रेस पक्ष पूर्ण पाठिंबा देऊ.”

दरम्यान, पत्रकारांनी “पंकजा मुंडे यांनी भाजप सोडल्यास काँग्रेस त्यांना पक्षात प्रवेश देईल का?” असा प्रश्न विचारला. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत, “पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडल्या, तर काँग्रेस त्यांचे शंभर टक्के स्वागत करेल,” असे सांगितले.

वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, पंकजा मुंडे यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vijay Wadettiwar to Pankaja Munde: Quit BJP, Become Maharashtra’s First OBC Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात