गणेश विसर्जनासाठी पुण्यात वाहतूक बदल; 17 प्रमुख रस्ते बंद राहणार

Ganesh Visarjan

विशेष प्रतिनिधी

पुणे: श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागासह शहरातील विविध परिसरांत मोठ्या प्रमाणावर वाहतूक बदल जाहीर केले आहेत.

मुख्य विसर्जन मिरवणूक 25 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते बंद, वाहतूक वळविणे, नो-पार्किंग आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्य विसर्जन मिरवणुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता यांसह 17 प्रमुख मार्गांवर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद केली जाणार आहे.

शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक निर्बंध पहाटे 5 वाजल्यापासून लागू होतील. टिळक रस्त्यावर सकाळी 9 वाजल्यापासून, तर बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता आणि शास्त्री रस्त्यावर सकाळी 10 वाजल्यापासून वाहतुकीवर निर्बंध लागू केले जातील.

जंगली महाराज रस्त्यावर सकाळी 11 वाजल्यापासून, तर कर्वे रस्त्यावर दुपारी 12 वाजल्यापासून वाहतूक बंद केली जाणार आहे. हे निर्बंध विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत कायम राहतील.फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता आणि गुरुनानक रस्ता या मार्गांवरही निश्चित वेळेनंतर वाहतूक बंद करण्यात येणार आहे.



दहा ठिकाणी वाहतूक वळविणार

विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर गर्दी आणि मिरवणुकीच्या हालचाली लक्षात घेऊन दहा प्रमुख ठिकाणी वाहतूक वळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये जंगली महाराज रस्त्यावरील झाशी राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील अपोलो टॉकीज-दरुवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलिस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक आणि सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक यांचा समावेश आहे.

तसेच बाजीराव रस्त्यावरील सावरकर पुतळा चौक, शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील गुडलक चौक येथूनही आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणुकीच्या तयारीचा भाग म्हणून 24 सप्टेंबरच्या रात्रीपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग निर्बंध लागू केले जाणार आहेत.

वाहतूक पोलिसांनी नागरिक आणि वाहनचालकांना शक्यतो मध्यवर्ती पुणे परिसर टाळण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Traffic changes in Pune for Ganesh Visarjan; 17 major roads to remain closed.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात