बँक ग्राहकांनो लक्ष द्या! सप्टेंबरच्या अखेरीस संप, आधीच उरका ‘ही’ कामे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. मात्र,  संपापूर्वी 26 सप्टेंबरला चौथा शनिवारी आणि 27 सप्टेंबरला रविवार असल्याने आणि नंतर तीन दिवस संपामुळे बँकांचे कामकाज सलग पाच दिवस बंद राहणार आहे. Bank customers

यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासह इतर बँका सप्टेंबरच्या अखेरीस पाच दिवस बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बँकांनी ग्राहकांना 25 सप्टेंबरपूर्यंत बँकेच्या शाखेत जाऊन करावी लागणारे आवश्यक व्यवहार पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

कोणती कामे आधी पूर्ण करावीत?

रोख रक्कम जमा करणे, धनादेशाशी संबंधित काम, केवायसी, कागदपत्रे जमा करणे किंवा कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष मदतीची गरज असलेली आर्थिक व्यवहार आधीच पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही बँकांनी ग्राहकांना याबाबत संदेश पाठवण्यास सुरूवात केली आहे,ज्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळता येईल. चेकशी संबंधित कामांना वेळ लागू शकतो.



तसेच ‘ईएमआय’, ‘एसआयपी’, किंवा इतर कोणत्याही ऑटो-डेबिटसाठी खात्यात पुरेसे पैसे ठेवा. एखाद्या पेमेंटची तारीख संपादरम्यान असेल तर त्याचे पेमेंट आधीच करून घ्या.

काय सुरू राहणार?

मात्र, संपामुळे सर्व बँकिंग सेवा बंद होणार नाहीत. शाखांशी संबंधित कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मात्र, ‘एटीएम’, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, ‘यूपीआय’, आणि योनो यांसारख्या डिजिटल सेवांचा वापर करता येणार आहे. पंरतु, उपलब्धता संबंधित बँकेच्या व्यवस्थेवर अवलूंबन राहू शकते. त्यामुळे ग्राहकांनी महत्त्वाचे डिजिटल व्यवहारही 25 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून घ्यावे.

काय आहे संपाचे कारणे?

‘यूएफबीयू’ आठवड्यातून पाच दिवस बँकिंग लागू करण्याची मागणी केली आहे. 2024 च्या वेतन सुधारणा कराराशी संबंधित चर्चेत ही मागणी मान्य करण्यात आली होती, मात्र तिची अंमलबाजवणी झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच पेन्शन आणि महागाई भत्त्याशी संबंधित काही मागण्यांचाही यामध्ये समावेश आहे.

Bank customers, take note! A strike is scheduled for the end of September; complete ‘these’ tasks beforehand.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात