सुनेत्रा पवार यांच्या नावे निवडणूक आयोगाचे पत्र; राष्ट्रवादी काँग्रेसला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

पक्षाच्या संविधानातील बदलांबाबत अधिकृत ठराव आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याची आयोगाची सूचना

विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षाच्या संविधानात करण्यात आलेल्या बदलांबाबत आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत ठराव सादर करण्यास सांगितले आहे. आयोगाने 27 जुलै रोजी पाठवलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावे पाठवण्यात आले आहे. ही नियमित कायदेशीर प्रक्रिया असली, तरी पक्षासाठी ती महत्त्वाची मानली जात आहे.



आयोगाने पत्रात नमूद केले आहे की, पक्षाच्या संविधानातील कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये करण्यात आलेल्या बदलांना मंजुरी देणारे अधिकृत ठराव किंवा संबंधित कागदपत्रे आयोगाला अद्याप प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे हे बदल मान्य करणारे मूळ प्रस्ताव आणि इतर आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संविधानात काही संघटनात्मक आणि तांत्रिक बदल करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या विशेष राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून एकमताने निवड करण्यात आली. याच बैठकीत संबंधित घटनात्मक दुरुस्त्यांनाही मंजुरी देण्यात आली होती.

नियमांनुसार, कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या संविधानात केलेले बदल आणि त्यासंबंधीचे अधिकृत ठराव निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक असते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने आयोगाने स्मरणपत्राच्या स्वरूपात हे पत्र पाठवले आहे.

Sunetra Pawar Receives EC Letter Over NCP Constitution Amendments

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात