सतीश सालियन यांच्या नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर !

Aditya Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांच्या नोटिशीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंनी सतीश सालियन यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आल्याचेही आदित्य ठाकरे यांनी या उत्तरात म्हटले आहे. Aditya Thackeray

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करत आपल्यावरील आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. तसेच दिशा सालियनला ओळखत नाही, तिच्याशी कधीही भेट झाली नसल्याचा दावाही केला होता. त्यानंतर दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांना नोटीस दिली होती.

आदित्य ठाकरे यांचे उत्तर

आता आदित्य ठाकरे यांच्या वकिलांकडून सतीश सालियन यांच्या कायदेशीर नोटिसीला उत्तर देण्यात आले आहे. सतीश सालियन यांनी केलेले सर्व आरोप आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावले असून ते तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. 16 सप्टेंबरच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सतीश सालियन यांचे नाव कुठेही घेतलेले नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. पोस्टमधील कोणतेही विशिष्ट वाक्य सतीश सालियन यांच्याकडे निर्देश करत नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.

तसेच संबंधित प्रकरणातील आरोपांवर अधिकृत तपास होण्याची गरज असून आदित्य ठाकरेंनी त्याची निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. सतीश सालियन यांच्याविरोधात बदनामीचा कोणताही हेतू नसल्याचे आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

Aditya Thackeray’s reply to Satish Salian’s notice!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात