संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल; जयकुमार गोरे प्रकरणावरून भाजप आक्रमक

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३५६(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांनी अवमानकारक आणि अशोभनीय भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे मंत्री गोरेंची प्रतिमा मलिन झाली असून त्यांची बदनामी झाल्याचा दावा भाजपने केला आहे.



या वादाची सुरुवात देहू येथे झालेल्या भाजपच्या नव्या कार्यालय आणि रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमातून झाली. या कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली होती. संसदेत सरकारला जाब विचारण्याऐवजी विरोधक बाहेर आंदोलने करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व उरले नसल्याचा दावा करत आगामी निवडणुका ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असा टोला त्यांनी लगावला होता.

गोरे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांच्या भाषेवर भाजपने आक्षेप घेत कायदेशीर कारवाईची भूमिका घेतली. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय आणि कायदेशीर वळण मिळाले.

दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटले. मोहोळ तालुक्यातील अनगर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन केले. अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले.

या घटनेमुळे महायुती आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Sanjay Raut Booked Over Alleged Derogatory Remarks Against Minister Jaykumar Gore

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात