वृत्तसंस्था
मुंबई : सूर्यवंशी चित्रपटातील अभिनयासाठी मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हेच माझे प्रेरणास्थान आहे, असे आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार याने म्हंटले आहे. Vishwas Nangre-Patil is my inspiration for acting in Suryavanshi movie: Akshay Kumar
अक्षय कुमार यांनी अभिनय केलेला सूर्यवंशी रिलीज झाला आहे. त्यात त्याने धडाडीचे पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांना समोर ठेऊन मी ही भूमिका केल्याचे त्याने सांगितले. नांगरे- पाटील धडाडीचे पोलिस अधिकारी आहेत. तसेच प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे.
मुंबईवरील २६/ ११ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी केवळ पिस्तूल घेऊन ताज हॉटेलमध्ये ते शिरले होते. त्यांच्या धाडसाचे त्यावेळी कौतुकही झाले होते. सूर्यवंशी चित्रपटात पोलिस उपायुक्त वीर सुर्या या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. या भूमिकेसाठी विश्वास नांगरे – पाटील यांचा आदर्श समोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App