विशेष प्रतिनिधी
चेन्नई – चेन्नई शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाने चेन्नई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत. २०१५ रोजी पूर आल्यानंतर आपण काय करत आहात? दुर्दैवाने निम्मे वर्ष पाण्याची वाट पाहण्यात जातो आणि पुढील निम्मे वर्ष हे पुराशी सामना करतोHigh court lashes on Tamilnadu Govt.
आणि काही वेळा पाण्यातच बुडून जीव जातो, अशा शब्दांत न्यायालयाने महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.अतिक्रमण हटवण्यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने चेन्नई महानगरपालिकेला सुनावले आहे.
शहराला जलमय होण्यापासून वाचवण्यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांत कोणतेच पुरेसे उपाय न केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी आणि न्यायाधीश पी.डी. ऑडिकेसवालू यांच्या पीठाने राज्यातील पूरस्थितीबाबत आश्च?र्य व्यक्त केले.
ते म्हणाले की, २०१५ च्या पुरानंतर पाच वर्षात अधिकाऱ्यांनी काय काम केले? पूर रोखण्यासाठी कोणतेच पावले का उचलली नाहीत. वर्षाचे सुरवातीचे सहा महिने पाण्यासाठी आपल्याला वणवण भटकावे लागते आणि नंतरच्या काळात आपल्याला पुराशी दोन हात करावा लागतो. काहीवेळा पाण्यात जीव देण्याशिवाय पर्याय राहत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App