त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार


भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत.What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमरावती बंद दरम्यान झालेला हिंसाचार हा भाजपचा सुनियोजित कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. त्याच सोबत मलिकांनी भाजप आमदार आशीष शेलार यांच्यावर देखील आरोप केले आहेत. भाजपने पुकारलेल्या अमरावती शहर बंद दरम्यान मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसचारमुळे राजकीय वर्तुळात चांगलेच आरोप-प्रत्यारोप बघायला मिळत आहेत. या घटनेप्रकरणी नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर भाजप आमदार आशीष शेलार यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे सडेतोड उत्तर शेलार यांनी दिले आहे.ते म्हणाले, अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा आहे.पण त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आमदार आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात काय करत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. त्यावर बोलताना शेलार म्हणाले, जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही.

What is the connection between the riots in Maharashtra after the Tripura incident and the photo of 2016-17? – Ashish Shelar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती