आशीष शेलार कृष्ण कुंजवर जाऊन घेणार राज ठाकरेंची भेट ; BMC साठी अखणार नवी समीकरणे

राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे. आज पाडव्याच्या मुहूर्ताला ते नव्या घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे.Ashish Shelar to visit Raj Thackeray at Krishna Kunj; New equations for BMC


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका आता दूर नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीगाठी होत असतात. आणि या भेटीमागे तर्क-वितर्क लावले जातील. राजकीय अर्थ काढले जाणार, हे निश्चित आहे.दरम्यान आज भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.दिवाळीमध्ये झालेली ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांनी कृष्ण कुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे. आज पाडव्याच्या मुहूर्ताला ते नव्या घरी शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे.राज ठाकरे आणि आशिष शेलार हे परस्परांचे चांगले मित्र सुद्धा आहेत.शिवसेनेने भाजपाची साथ सोडल्यामुळे भाजपा नव्या मित्राच्या शोधात आहे.भाजपा-मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे.युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

पुढच्यावर्षाच्या सुरुवातील फेब्रवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. काहीही करुन शिवसेनेला पालिकेत सत्तेतून खाली खेचण्याचा डाव भाजपाने आखला आहे. त्या दृष्टीने भाजपा आखणी करत आहे. भाजप-मनसे एकत्र आल्यास शिवसेनेसमोर निश्चित आव्हान निर्माण होऊ शकते.

Ashish Shelar to visit Raj Thackeray at Krishna Kunj; New equations for BMC

महत्त्वाच्या बातम्या