३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी


महापालिका निवडणुका स्वबळावर की महाआघाडी सोबत लढायच्या याबाबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.Interviews given by 345 aspirants, NCP’s self-examination in Aurangabad


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे विविध पक्षांकडून निवडणूकीची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. यावेळी महापालिका निवडणुका स्वबळावर की महाआघाडी सोबत लढायच्या याबाबत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्यासाठी ३४५ इच्छूकांनी काही दिवसांपूर्वीच मुलाखती दिल्या.दरम्यान पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले तर स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. राष्ट्रवादी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय साळवे यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढलो तर पक्षाच्या हिताचे राहिल असे सांगितले. परंतु ऐन वेळेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्या अनुषंगाने तयारी ठेवावी. असे पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.



नवीन व उच्चशिक्षित चेहऱ्यांना संधी

राज्य शासनाने जुनी वॉर्ड पद्धत रद्द करुन प्रभाग पध्दतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षापासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पाहणाऱ्या राजकीय मंडळींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. नवीन व उच्चशिक्षित चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. शहराच्या विकासासाठी काम करणारे उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी आमची तयारी सुरु आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे चांगले उमदेवार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस, बसपा आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे पक्षात उत्साह पसरला आहे.पक्षाची ताकद वाढत चालली आहे. असा संदेश पक्षातील प्रमुखांपर्यंत गेल्यामुळे जोमाने कामाला लागा अशा सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.

Interviews given by 345 aspirants, NCP’s self-examination in Aurangabad

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात