अमेरिकेत मंदिर उभारणीदरम्यान भारतीय कामगारांचे शोषण, स्वामीनारायण संस्थेविरोधात खटला


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क  : भारतातील शेकडो कामगारांना आमिष दाखवत अमेरिकेत आणत त्यांना येथील मंदिर निर्माणाच्या कामासाठी कमी वेतनावर जुंपल्याचा आरोप येथील अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेवर झाला असून त्याबाबत खटलाही दाखल झाला आहे. Unrest in temple labors in USA

न्यूजर्सी येथे उभारण्यात येत असलेल्या स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामावर प्रति तास एक डॉलर या वेतनावर काम करण्याची बळजबरी त्यांच्यावर केली जात असल्याची आणि बांधकामाच्या ठिकाणीच डांबून ठेवण्यात आल्याची या कामगारांची तक्रार आहे.



अमेरिकेत कामगारांना दर तासाला किमान ७.२५ डॉलर इतके वेतन देण्याचा कायदा आहे. या खटल्यात गेल्याच महिन्यात सुधारणा करत स्वामीनारायण संस्थेने अटलांटा, शिकागो, ह्युस्टन आणि लॉस एंजेलिस येथेही मंदिर उभारणीसाठी भारतातून कामगार आणले असून त्यांना महिन्याला केवळ ४५० डॉलर वेतन दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अशा प्रकारे शेकडो कामगारांचे शोषण झाले असल्याचे या खटल्यात म्हटले आहे. येथील इंडिया सिव्हील वॉच इंटरनॅशनल या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एफबीआय या अमेरिकेच्या तपास संस्थेने मे महिन्यात छापा घालत सुमारे दोनशे कामगारांची सुटकाही केली होती. स्वामीनारायण संस्थेने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

Unrest in temple labors in USA

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात