नाशिक : दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!, हे राजकीय चित्र आजच्या INDI आघाडीच्या बैठकीच्या वेळी समोर आले.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आज पहिल्यांदाच “इंडी” आघाडीची बैठक दिल्लीत झाली. त्या बैठकीत 23 पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला. पण द्रविड मुन्नेत्र कळघम, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी या तीन महत्त्वाच्या राजकीय घटकांनी त्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे बहिष्कारच्या बातम्या जास्त गाजल्या, पण त्याही पलीकडे जाऊन दिल्लीत शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या नावाने लावलेली पोस्टर्स गाजली. दिल्लीतल्या रस्त्यांवर शरद पवार आणि ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्ट नेते पिनराई विजयन यांची भली मोठी पोस्टर्स लागलेली दिसली. त्या पोस्टर्स मधून राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर मीठ चोळले गेले. शरद पवार, ममता बॅनर्जी आणि पिनराई विजयन यांनी वेगवेगळ्या वेळी राहुल गांधींच्या नेतृत्वातल्या उणीवा दाखविणारी व्यक्तव्य केली होती, तीच राहुल गांधींच्या विरोधकांनी पोस्टरवर नेमकेपणाने छापली. त्यामुळे “इंडी” आघाडीच्या बैठकीलाच राजकीय अपशकुन झाला.
– राहुल गांधींकडे प्रगल्भता आणि सातत्य नाही
एकीकडे मुंबईतून संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा विषय लावून धरला, त्याच वेळी शरद पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सातत्याची आणि प्रगल्भतेची कमी असल्याचे वक्तव्य केल्याचे पोस्टरवर दिसले. ममता बॅनर्जी काँग्रेसचे वाभाडे काढल्याचे दिसले. काँग्रेसने आपली विश्वसनीयता गमावली आहे. आपण काँग्रेसवर निर्भर राहू शकत नाही, असे ममता म्हणाल्याचे पोस्टर वर लिहिल्याचे आढळले. राहुल गांधी राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत, पण त्यांच्या कडे काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असलेली राजकीय समज सुद्धा अस्तित्वात नाही, असा टोला पिनराई विजयन यांनी हाणल्याचे पोस्टरवर दिसले.
– INDI आघाडीतली विसंगती बाहेर
दिल्लीतल्या रस्त्यांवर ही पोस्टर्स बराच वेळ झळकत होती. अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल केले. त्यामुळे इंडिया गाडीच्या बैठकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वाची आणि काँग्रेसची नाचक्की झाली. त्यानंतर काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जाग आली आणि त्यांनी दिल्लीतल्या रस्त्यांवरची पोस्टर्स शोधून काढून ती फाडून टाकली. पण पोस्टर्स फाडली, तरी “इंडी” आघाडीतली राजकीय विसंगती उघड्यावर आल्याशिवाय राहिली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App