विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रातील वृक्षतोड आणि पर्यावरणाला होत असलेल्या नाहक त्रासाबद्दल पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे कायम आवाज उठवतात. सयाजी शिंदे पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या 3 डिसेंबरला पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज प्रकल्पासाठी पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या नसतानाही, दोन वर्षांपासून डोंगर पोखरून अतिदुर्मिळ झाडांची कत्तल सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
याप्रकरणी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच कंपनीला काळ्या यादीत टाकावे, आणि हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी मागणी सयाजी शिंदे यांनी केली आहे. एकही झाड न तोडता आणि पर्यावरणाचा ऱ्हास न करता वीज प्रकल्प राबवले जावेत, अशी स्पष्ट भूमिका यावेळी सयाजी शिंदे यांनी मांडली. पर्यावरणाला होत असलेल्या त्रासाविरोधात सयाजी शिंदे यांनी मोठं पाऊल उचलण्याचे ठरवले आहे.
येत्या 3 डिसेंबरला पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा सयाजी शिंदे यांनी केली आहे. झाडे आणि पुढची पिढी वाचवण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले आहे. यादरम्यान त्यांनी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारला संबंधित कंपनीच्या दोषींवर कारवाई करावी, यासाठी सार्वजनिक कायदेशीर नोटीस वकिलामार्फत बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App