प्रकाश आंबेडकरांनी RPI चे अध्यक्षपद स्वीकारावे, मला मंत्रिपदापेक्षा समाजऐक्य महत्त्वाचे; रामदास आठवले यांची मोठी ऑफर

विशेष प्रतिनिधी

धाराशिव: आगामी 2029 च्या निवडणुकांपूर्वी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्तेत मोठा वाटा मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे गरजेचे असून, प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मोठी ऑफर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) धाराशिव येथे दिली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी सांगितले की, मला माझ्या मंत्रिपदापेक्षा समाजाचे ऐक्य महत्त्वाचे आहे;

सर्व लहान-मोठे गट विसर्जित करून एकच रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावे, या निर्णयाला माझी कोणतीही हरकत नसेल. 1990 मध्ये बाळासाहेब आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर समाजाला सत्तेत मोठा सहभाग मिळाला असता, अशी आठवण सांगत सध्या त्यांच्याशी थेट बोलणे होत नसून ते ऐक्यासाठी तयार नसल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली.

शरद पवार 2019 मध्ये एनडीएमध्ये आले असते, तर 2022 मध्ये राष्ट्रपती झाले असते: रामदास आठवले

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या आणि शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, अजितदादा पवार हयात असते तर कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय होऊ शकला असता; मात्र त्यांच्या अकाली जाण्यामुळे आता हे एकत्रीकरण शरद पवार एनडीएमध्ये येणार की नाही, यावरच अवलंबून आहे.



विकासाची आणि शेतकऱ्यांची जाण असणाऱ्या शरद पवारांनी 2019 मध्येच एनडीएसोबत येण्याचा निर्णय घेतला असता तर ते 2022 मध्ये देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, पण त्यांनी ती संधी गमावली, असे आठवले यांनी नमूद केले. तसेच, शरद पवारांच्या पक्षाचे 8 खासदार महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देत असतील तर तो चांगला निर्णय असून, खासदारांना फोडण्यासाठी ₹150 कोटी देण्याचा संजय राऊत यांचा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

मराठवाड्याच्या दुष्काळासाठी केंद्राकडे 40 हजार कोटींचा प्रस्ताव; मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतराची मागणी

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, मराठवाड्यात 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ पडला असून राज्य सरकारने पीक नुकसान भरपाईचे निकष लवकरात लवकर जाहीर करावेत; तसेच केंद्र सरकारकडे ₹40,000 कोटींच्या विशेष मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून उद्योगपतींनीही काही तालुके व जिल्हे दत्तक घ्यावेत.

दरम्यान, सोनिया गांधींच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मांडलेल्या वादग्रस्त भूमिकेवर आणि आणीबाणीच्या मुद्द्यावर आठवले यांनी टीका केली, तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून अपयशी ठरल्याचा आरोप केला. याशिवाय, दादर आणि नागपूर रेल्वे स्थानकांच्या नामांतराबाबत सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देशभरात गाड्या जाणाऱ्या ‘मुंबई सेंट्रल’ या मोठ्या जंक्शनला द्यावे, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.

Ramdas Athawale Offers RPI President Post to Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात