रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…

Know History Of Raza Academy Accused In Violence In Maharashtra For Tripura Incident Protest

History Of Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला दहशतवादी संघटना म्हणत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचे नितेश राणे म्हणाले. यामुळे रझा अकादमी काय आहे याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रझा अकादमीच्या इतिहासाबद्दल येथे थोडक्यात माहिती देत आहोत. Know History Of Raza Academy Accused In Violence In Maharashtra For Tripura Incident Protest


विशेष प्रतिनिधी

मुंबई : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला दहशतवादी संघटना म्हणत तिच्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथील हिंसाचाराला रझा अकादमी जबाबदार असल्याचे नितेश राणे म्हणाले. यामुळे रझा अकादमी काय आहे याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रझा अकादमीच्या इतिहासाबद्दल येथे थोडक्यात माहिती देत आहोत.

रझा अकादमीचा इतिहास

रझा अकादमीची स्थापना 1978 मध्ये अलहाज मोहम्मद सईद नुरी यांनी केली होती. नुरी 1986 पासून रझा अकादमीचे अध्यक्ष होते. सुन्नी विद्वानांची विशेषत: इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतरांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी रझा अकादमीची स्थापना करण्यात आली. रझा अकादमीने उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत विविध इस्लामिक विषयांवर शेकडो पुस्तके प्रकाशित केली आहेत.

रझा अकादमीचा उद्देश

बरेलीहून आलेल्या इमाम अहमद रझा खान या धार्मिक गुरूच्या नावावरून रझा अकादमीचे नाव देण्यात आले. रझा अकादमी मुस्लिम धर्माशी संबंधित पुस्तके छापण्याचे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. संस्था सुरू करण्याचा खरा उद्देश मुस्लिम धर्माची पुस्तके प्रकाशित करणे, धार्मिक पुस्तके जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवणे, मदरसा आणि दीनशी संबंधित पुस्तकांचे भाषांतर करणे हा होता. रझा अकादमीची स्थापना झाली तेव्हा ती एक शैक्षणिक संस्था होती. त्याची नोंदणीही रझा वेलफेअर सोसायटीच्या नावाने करण्यात आली. हळूहळू ती सामाजिक संस्था बनली. मुस्लीम समाजाशी निगडीत प्रत्येक मुद्द्यावर ते आपले मत मांडू लागले. त्या मुद्द्यावर मुस्लिम लोकांना एकत्र करण्याचे काम सुरू केले. मुंबईतील आझाद मैदानावर दंगल उसळली तेव्हा रझा अकादमीचे नाव चर्चेत आले.

आझाद मैदान दंगलीत रझा अकादमीचे नाव

Know History Of Raza Academy Accused In Violence In Maharashtra For Tripura Incident Protest

आसाममधील हिंसाचार आणि म्यानमारमधील रोहिंग्यांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलक जमले. मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली, अमर जवानाच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. पोलिसांसोबत प्रचंड हिंसा झाली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत खासगी आणि सरकारी मालमत्तेचे अडीच कोटींहून अधिक नुकसान झाले होते.

तेव्हा पोलिसांनी सांगितले होते की, त्यांना केवळ 1500 लोक निषेधासाठी येतील असे सांगण्यात आले होते. परंतु जमलेली गर्दी 40,000च्या आसपास होती. अरुप पटनायक हे त्यावेळी मुंबई शहराचे पोलीस आयुक्त होते, या घटनेनंतर त्यांची बदली करण्यात आली होती. रझा अकादमीने महाराष्ट्रातील मुस्लिमांसाठी नोकरी आणि शिक्षणात ५% आरक्षणाची मागणी केली आहे.

याशिवाय रझा अकादमीने सर्व राज्य सरकारांकडे मोहम्मद पैगंबर विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे. ज्यानुसार इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यावर कठोर शिक्षेची तरतूद असावी. पवित्र कुराणाचा अपमान केल्याप्रकरणी रझा अकादमीने तमिळ वेब सीरिज नवरसवर बंदी घालण्याची मागणीही केली होती.

2020 मध्ये देशभरात सुरू असलेल्या सीएए व एनआरसीविरोधातील आंदोलनांसंदर्भात रझा अकादमीच्या नेत्यांसह २०० मुस्लिम नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावरूनही मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत दंगली घडवून

कोरोना लसीलाही विरोध

रझा अकादमीने सौदी अरेबियाच्या इस्त्रायल समर्थक वृत्तीचा विरोध केला होता. मोहम्मद द मेसेंजर या इराणी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही रझा अकादमीने केली होती. रझा अकादमीने भारतातील कोरोना लसीला फ्रान्सच्या विरोधाबाबत फतवाही काढला होता. रझा अकादमीने लसीबाबत WHOला पत्र लिहिले आहे. रझा अकादमीने म्हटले होते की, आधी सरकार किंवा लस बनवणाऱ्या कंपनीने सांगावे की या लसीमध्ये काय मिसळले आहे? त्यानंतरच ते मुस्लिम समाजातील लोकांना लस घेण्यास सांगतील.

केंद्र सरकारने तिहेरी तलाकबाबतचे विधेयक मंजूर केले तेव्हा रझा अकादमीने त्याला विरोध केला आणि सरकार त्यांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटले. रझा अकादमीने प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्याबाबतही फतवा काढला आहे.

रझा अकादमीशी संबंधित वादग्रस्त घटना

१. 1988 मध्ये संस्थेने सॅटॅनिक व्हर्सेस या पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्या विरोधात फतवा काढला होता. या फतव्यानंतर संघटना चर्चेत आली होती.

२. भारत आणि इस्रायल यांच्यातील 1992 च्या राजकीय कराराच्या निषेधार्थ संघटनेने मुंबईत मोर्चा काढला होता. अकादमीने तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना इस्रायलसोबतचा करार मोडण्याची विनंती केली होती.

३. संघटनेने यापूर्वी मुंबईत तस्लिमा नसरीन आणि मुहम्मद ताहिर-उल-कादरी यांच्या कार्यक्रमांचा निषेध केला होता.

४. रझा अकादमी 11 नोव्हेंबर 2012 रोजी पहिल्यांदा वादात सापडली होती. मुंबईतील आझाद मैदानावर रॅली काढण्यात आली. म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली. त्यावेळी काही मौलवींनी येथे प्रक्षोभक भाषणे दिली. यानंतर आझाद मैदानात जोरदार तोडफोड करण्यात आली. जमावाने मीडिया आणि पोलिसांना लक्ष्य केले होते. यानंतर मैदानाबाहेर अमर जवान ज्योतीचेही नुकसान झाले. शेजारी उभ्या असलेल्या गाड्या जाळल्या. महिला पोलिसांवरही हल्ला करण्यात आला. या हिंसाचारात 44 पोलिसांसह 50 जण जखमी झाले आहेत. दोन जणांचा मृत्यूही झाला.

५. सन 2015 मध्ये रझा अकादमीने प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्याविरुद्ध इस्लाम धर्माच्या प्रेषितांवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला.

६. सन 2018 मध्ये ‘ओरु अदार लव्ह – माणिक्य मलाराया पूवी’ मधील एका व्हायरल गाण्याच्या सार्वजनिक प्रसारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, यात प्रेषित मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीचा अवमान केल्याचा आरोप होता.

७. कोरोनाच्या काळात युद्धपातळीवर तयारी करताना देशाने लस विकसित केली. लस जगभर पाठवून त्यांनी मानवतेचा आदर्श घालून दिला. परंतु रझा अकादमीचे प्रमुख सईद नूरी यांनी या लसीवर शंका व्यक्त केली आणि ३० जानेवारी २०२० रोजी थेट जागतिक आरोग्य संघटनेला पत्र लिहून या लसीमध्ये डुकराची चरबी आहे की नाही हे तपासण्यास सांगितले. तसे असल्यास कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने ही लस घेऊ नये, असे आवाहन केले.

८. याशिवाय कोरोनामुळे 23 मार्च 2020 पासून सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. यावर सईद नूरी यांनी पत्र लिहून राजभवनात नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. या बदल्यात हिंदु जनजागृती समितीनेही राज्यपालांना राजभवनात पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पत्र लिहून केली होती.

९. रझा अकादमीने जुलै २०२० मध्ये ‘द मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. या चित्रपटामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील, असं रझा अकादमीचं म्हणणं होतं. खरंतर, इराणमधील दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी २०१५ मध्ये बनवलेल्या या चित्रपटावर इस्लामी देश असलेल्या इराणमध्येही बंदीची मागणी केली गेलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रझा अकादमीच्या मागणीची तातडीनं दखल घेत केंद्र सरकारकडे बंदीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. यातून सत्ताधारी आघाडीला विशिष्ट धर्मीयांचे लांगुलचालन करायचे आहे, हे स्पष्ट होत असल्याचा आरोपही तेव्हा विरोधकांनी केला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाला कडाडून विरोध केला होता, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या भूमिकेचे विस्मरण झाल्याचा आरोपही विरोध केला होता.

१०. स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विक्स यांच्या मृत्यूनंतर, रझा अकादमीने 5 मे 2021 रोजी त्यांचा मृत्यू साजरा केला. कारण लार्स विक्सने प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढले होते.

११. फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रेषित मोहम्मद यांचे चित्र प्रकाशित केल्याबद्दल बीबीसीविरुद्ध आक्षेप घेतला आणि तक्रार दाखल केली होती. बीबीसीचे संपादक मुकेश शर्मा यांनी रझा अकादमीचे सरचिटणीस मौलाना सईद नूरी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, बीबीसीने आधीच व्हिडिओ सुधारित केला आहे आणि मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या बाबी काढून टाकल्या आहेत.

१२. आता नोव्हेंबर 2021 मध्ये त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनेवरून महाराष्ट्रभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलने, दंगलीचा आरोप रझा अकादमीवर होत आहे. यावरून या संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

रझा अकादमीने आरोपांवर काय म्हटले?

सध्याच्या दंगलींच्या आरोपांवर रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी माध्यमांना म्हणाले, “आम्ही आमच्या कोणत्याही सदस्याला हिंसाचार किंवा दंगली पसरवण्याचा आदेश दिलेला नाही. बंद शांततेत पार पडणार असल्याचे सांगण्यात आले. दंगलखोर प्रत्येक गर्दीत सामील होतात. पोलिसांनीही तपास करावा, आम्हीही मदत करू. दोषींना सोडता कामा नये. राजकीय पक्ष काहीही म्हणोत. निवडणूक जवळ आली आहे. इंग्रजांचे फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले जात आहे.

नूरी पुढे म्हणाले, ‘या सर्व राजकीय गोष्टी आहेत. आंदोलन शांततेत करण्याचे सांगण्यात आले. वसीम रिझवी यांनी लिहिलेल्या पुस्तकात आमच्या पैगंबराला शिवीगाळ करण्यात आली आहे. त्यांची बदनामी करण्यात आली आहे. रिझवी यांच्यावर कारवाई झाली असती, तर हे सर्व घडले नसते.

बंदी लादण्याच्या मागणीवर बोलताना सईद नूरी म्हणाले, ‘जे बंदुकांचे वाटप करत आहेत. ते दंगली घडवून आणतात, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. आम्ही गरीब लोक आहोत. गरिबांचा प्रश्न मांडावा. जो दुर्बल आहे त्याला लोक दाबतात.”

Know History Of Raza Academy Accused In Violence In Maharashtra For Tripura Incident Protest

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण