कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : सप्टेंबरमध्ये खंडित झालेली विमानसेवा कोल्हापूर विमानतळावर नुकतीच सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर विमानतळावरून मुंबई कोल्हापूर हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोल्हापूरमध्ये ट्रुजेट या कंपनीकडून विमानसेवा पुरवली जाते. सप्टेंबर मध्ये तांत्रिक अडचण झाल्यामुळे विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. पण सध्या कोरोणाचा ज्वर कमी झालेला आहे आणि दिवाळीचा सीझन सुरू आहे. त्यामुळे ही सेवा पुन्हा चालू करण्यात आली होती. मात्र ही सेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांना मात्र भारी अडचण सहन करावी लागत आहे. त्यांना बेळगाव किंवा बॅंगलोर मार्गे मुंबईला जावे लागत आहे. एक स्टॉप आणखी वाढल्यामुळे त्यांना तिकिटाचा खर्चही जास्त द्यावा लागत आहे.

Dissatisfaction among passengers due to irregular flights at Kolhapur Airport

मुंबईहून दररोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारणतः 60 इतकी आहे. तर कोल्हापूर ते मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण 40 वगैरे आहे. इतक्या मोठ्या संख्येने प्रवाशांची ये जा सुरू असते.

ट्रू जेट कंपनीच्या वेबसाइटवर 16 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान तिकीट नोंदणीसाठी कोणतेही अपडेट दाखवले जात नाहीये. त्यामुळे अजून किती दिवस ही सेवा अनियमित राहणार यावर प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. मध्ये जेव्हा पुणे एअरपोर्ट बंद होते, तेव्हा बऱ्याच लोकांनी पर्याय म्हणून कोल्हापूर एअरपोर्टचा वापर करणे प्रेफर केले हाेते.


कोल्हापूर- मुंबई विमानसेवेबाबत आनंदाची बातमी ; १ जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस सेवा सुरू


कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय सेठी यांनी टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना माहिती दिली की, कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास करणार्याची संख्या अधिक आहे. व्यापारात तसेच अन्य कारणांमुळे ही संख्या अधिक आहे. त्यामुळे ट्रूजेट कंपनीने लवकरात लवकर ही विमानसेवा सुरळीत चालू करावी.

दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत घेतलेल्या मिटींगमध्ये कोल्हापूर विमानतळासाठी 64 एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे.

Dissatisfaction among passengers due to irregular flights at Kolhapur Airport

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात