कोल्हापूर- मुंबई विमानसेवेबाबत आनंदाची बातमी ; १ जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस सेवा सुरू


सध्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे कोल्हापूर- मुंबई विमान सेवा काही काळासाठी स्थगित आहे. Good news about Kolhapur-Mumbai Airlines; Service starts from January 1, seven days a week


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विमानांची संख्या मर्यादित व उपलब्ध विमाने इतर मार्गावर वळविल्यामुळे कोल्हापूर – मुंबई विमानसेवा वारंवार खंडीत होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान अनियमित असलेली कोल्हापूर- मुंबई विमानसेवेबाबत आनंदाची बातमी आहे.

नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस कोल्हापूर – मुंबई विमानसेवा सुरू राहणार आहे.याबाबत डीजीसीएकडून हिरवा कंदील मिळाला आहे. ही माहिती ट्रू जेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.सध्या कंपनीच्या देखभाल दुरुस्ती कामामुळे कोल्हापूर- मुंबई विमान सेवा काही काळासाठी स्थगित आहे. मागील काही दिवसांपासून वारंवार मुंबई विमानसेवा खंडीत होत असल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवड्यापासून निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे आठवड्यातील तीन दिवस नियमित विमानसेवा सुरू होत आहे. नवीन वर्षात मात्र सातही दिवस विमान सेवा सुरू राहणार असल्याचे जेट कंपनीचे अधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

Good news about Kolhapur-Mumbai Airlines; Service starts from January 1, seven days a week

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी