भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती


विशेष प्रतिनिधी

नाशिक: सागरा प्राण तळमळला, जयस्तुते यासारख्या अजरामर कविता आणि पन्नासहून अधिक पुस्तकांचे लेखन करणारे नाशिकचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये समावेश न करण्याचा कोतेपणा करण्यात आला होता.By writing Bhuja bhuja, Bhujbal was mentioned but there was no mention of Saavkar in the song of Sahitya Sammelan, after the anger of Saavkar lovers name included

मात्र, आयोजकांना अखेर उपरती झाली आहे. त्यासाठी संमेलन गीत पुन्हा नव्याने तयार करण्यात आले आहे. भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे असे म्हणून मंत्री छगन भुजबळ यांना खुश करण्याचा प्रयत्न गीतामध्ये करण्यात आला आहे.रामकथेचा पट उलगडला इथल्या मातीवरती
ज्ञानाने सोपान गाठता मुक्त होय निवृत्ती
गडकिल्ले हे शिवरायांना सदैव वंदन करती
स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती
हे कडवे या गीतामध्ये नव्याने समाविष्ठ करण्यात आले आहे.

गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे 1938 मध्ये झालेल्या 23 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता.

सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिकजवळील भगूर येथे झाला होता. अत्यंत प्रतिभाशाली साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी जवळपास पन्नासच्यावर पुस्तके लिहिली. त्यात 1857 चे स्वातंत्र्यसमर, संगीत उत्तरक्रिया, काळे पाणी, गांधी आणि गोंधळ, जोसेफ मॅझिनी, महाकाव्य कमला, महाकाव्य गोमांतक, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड , शत्रूच्या शिबिरात, संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष, सावरकरांच्या कविता अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

मात्र, असे असूनही सावरकरांच्या नावाचा उल्लेख साहित्य संमेलन गीतात उल्लेख नव्हता. विशेष म्हणजे संमेलन गीतामध्ये साम्यवादापासून ते थेट भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे असा उल्लेख होता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती.

त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार साहित्य संमेलन गीतातील नवे कडवे असे आहे

By writing Bhuja bhuja, Bhujbal was mentioned but there was no mention of Saavkar in the song of Sahitya Sammelan, after the anger of Saavkar lovers name included

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण