विशेष प्रतिनिधी
मुंबई: संशयित गँगस्टर आणि दाऊद इब्राहिमचा साथीदार रियाझ भाटी याच्यावर पत्नी रेहनुमा भाटीने धक्कादायक आरोप केले आहेत. पतीनेच अपाल्याला त्याचे व्यवाससायकि सहकारी आणि इतर उच्चपदस्थांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. कॉँग्रेसचे नेते राजीव शुक्ला, क्रिकेटपटू मुनाफ पटेल आणि हार्दिक पंड्या यांनीही आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे.Gangster wife blame Rajiv Shukla, Hardik Pandya, Munaf Patel for rape, husband forced her to sexual relation with high profile
‘द प्रिंट’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या तिच्या अर्जात रेहनुमा यांनी पंड्या, पटेल, शुक्ला आणि कोठारी यांचे कोणतेही पत्ते दिलेले नाहीत किंवा कथित घटना घडलेल्या विशिष्ट तारखा किंवा ठिकाणांचा उल्लेख केलेला नाही. पंड्या आणि पटेल यांना क्रिकेटपटू म्हणून ओळखले असताना, तिने शुक्ला यांचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष म्हणून वर्णन केले आहे. तिच्या अर्जात कोठारीसाठी कोणत्याही वर्णनाचा उल्लेख नाही,
रेहनुमा म्हणाली, मी पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. माझा अर्ज सप्टेंबरमध्ये सबमिट करण्यात आला होता, आता नोव्हेंबर आहे. मी अनेकवेळा विविध स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे. मला काही पैसे द्या असे सांगितले होते, पण मी भ्रष्टाचार का पसरवू? मी माझ्या जागी बरोबर आहे. तेच गुन्हेगार आहेत.
पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंघे यांनी रेहनुमा हिने अर्ज दिल्याचे मान्य केले, परंतु सध्या त्यांच्याकडे अधिक तपशील नाहीत असे सांगितले.भाटी हा सराईत गुन्हेगारआहे. त्याच्यावर खंडणी, फसवणूक आणि जमीन हडपण्याच्या प्रकरणांचे गुन्हे आहेत. मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परम बीर सिंग यांच्याविरुद्ध खंडणीच्या एफआयआरमध्येही त्याचे नाव आहे.
भाटी यांच्यावर आयपीएस अधिकारी आणि बडतर्फ पोलिस कर्मचारी सचिन वाजे यांच्या सांगण्यावरून बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. तो सध्या फरार आहे.भाटीची पत्नी रेहनुमा हिने त्याच्यावर त्याचे मित्र, व्यावसायिक सहकारी आणि इतर हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप देखील केला आहे. तिने नकार दिल्यास दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप केला आहे.
तिने म्हटले आहे की, 2011-2012 मध्ये कोठारीसोबत, 2014-15 मध्ये पटेल यांच्यासोबत आणि पंड्या आणि त्याचे दोन मित्र यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पंड्या आणि त्याच्या मित्रांनी दारू आणि ड्रग्सच्या प्रभावाखाली अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
माजी केंद्रीय मंत्री शुक्ला यांनी बलात्कार केल्याचे रेहनुमा यांनी तक्रारीत म्हटले आहे. रेहनुमा म्हटले की तिला नंतर कळले की शुक्ला देखील भारतीय क्रिकेटशी संबंधित आहेत. तिने लैंगिक संबंध ठेवण्यास संमती देण्यास नकार दिल्यावर शुक्ला यांनी तिला मारहाण करण्यात आली आणि नग्न नृत्य करण्यास भाग पाडण्यात आले.
रेहनुमाने दावा केला आहे की भाटी यांच्याकडे तिचे फोटो आणि व्हिडिओ आहेत, जे त्यांनी त्यांच्या विनंतीचे पालन न केल्यास सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली होती. तिने सांगितले की भाटी तिला ठार मारेल किंवा तिच्या मुलांचे अपहरण करेल अशी भीती वाटते. त्याने तिला 15-20 लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ वेश्याव्यवसायाच्या क्षेत्रात अडकविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App