कॉंग्रेस नेत्याच्या जीवावर उठलेल्या गॅंगस्टर मुख्तार अन्सारीला पंजाब सरकारकडून वाचविण्याचा प्रयत्न


कॉंग्रेस नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणारा गॅंगस्टर मुख्तार अन्सारी याला पंजाबमधीलच कॉंग्रेस सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्सारी याच्यासाठी पंजाबच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात लाखो रुपये खर्च करून वकीलांची फौज उभी केल्याचा आरोप केला जात आहे. An attempt by the Punjab government to save gangster Mukhtar Ansari, who was killed by a Congress leader


विशेष प्रतिनिधी

वाराणसी : कॉंग्रेस नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणारा गॅंगस्टर मुख्तार अन्सारी याला पंजाबमधीलच कॉंग्रेस सरकार वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अन्सारी याच्यासाठी पंजाबच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात लाखो रुपये खर्च करून वकीलांची फौज उभी केल्याचा आरोप केला जात आहे.

वाराणसीतील कॉंग्रेसचे माजी आमदार अजय राय यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये बहुजन समाज पक्षाचा बाहुबली आमदार मुख्तार अन्सारीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. मुख्तार गॅँगच्या शुटरनी १९९१ मध्ये वाराणसीमध्ये अजय राय बंधू अवधेश राय यांची हत्या केली होती. या खटल्यात मुख्तार अन्सारी मुख्य आरोपी आहे तर अजय राय हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अलाहाबाद न्यायालयात हा खटला चालू आहे. ९ फेब्रुवारीपासून सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मुख्तार अन्सारीच्या गुंडांकडून हत्या होण्याची भीती अजय राय यांना वाटत आहे.आपल्याच आमदाराच्या जीवावर उठलेल्या या कुख्यात गॅंगस्टरला पंजाबमधील कॉंग्रेसचे सरकार संरक्षण देत आहे. मुख्तार अन्सारी सध्या पंजाबच्या तुरुंगात आहे. उत्तर प्रदेश पोलीसांकडून वारंवार मागणी होत असूनही त्याला उत्तर प्रदेशात पाठविले जात नाही. ऐवढेच नव्हे तर त्याच्यासाठी वकीलही नेमले जात आहेत.

केवळ पंजाबच नव्हे तर राजस्थानातील सरकारही मुख्तार अन्सारी याची खातरदारी केली जात आहे. मुख्तार अन्सारी याचा आणि फरार गुन्हेगार असलेला मुलगा अब्बास अन्सारी याचा राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या आशिवार्दात जयपूरमध्ये चक्क शाही विवाहसोहळा झाला होता. यावरून मुख्तार अन्सारीने हत्या केलेल्या कृष्णानंद राय यांच्या पत्नी आमदार अलका राय यांनी थेट प्रियंका गांधी- वड्रा यांना सवाल केला होता. अब्बास याच्यावर याच्या खुनाचा गुन्हा आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेशात २५ हजार रुपयांचे इनामही आहे. मात्र, त्याचा जयपूरमध्ये शाही विवाह सोहळा झाला. फरार गुन्हेगार असतानाही कॉंग्रेस सरकारचा आशिर्वाद असल्याने पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

An attempt by the Punjab government to save gangster Mukhtar Ansari, who was killed by a Congress leader

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती