राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!

Ask Mr. Modi to open the cabinet of corruption files of NCP

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवारांबरोबर गेलेले सहकारी हे भाजप बरोबर गेलेले नाहीत, तर सत्तेबरोबर गेले आहेत. त्यांच्या अनेक फाईली टेबलवर होत्या, त्या कपाटात गेल्या. आजचे मरण उद्यावर ढकलले, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. परंतु आता पवारांच्या त्या अप्रत्यक्ष कबुलीची अजित पवार गटाने खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा, असा टोला अजित पवार गटाचे विधानसभेतले प्रतोद आणि मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शरद पवारांना हाणला आहे. Ask Mr. Modi to open the cabinet of corruption files of NCP

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप बरोबर सत्तेत जावे, अशी मागणी करणारे 53 आमदारांच्या सह्या असलेले पत्र आजही शरद पवार साहेबांच्या कपाटात असेल, हे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य खरं आहे. 53 आमदार यांच्यामधला मी सुद्धा एक आमदार आहे. 2019 मध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत बसायचे अशा आम्हा आमदारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. ते सह्या असलेले पत्र एक दिवस नक्की सर्वांना बघायला मिळेल, असेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.


सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांच्या गटाला इशारा, शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा ‘घड्याळ’ काढून घेऊ


फाईल्स, कपाट अन् चाव्या…

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईली मोदी साहेबांच्या कपाटात आहेत, असे अजब वक्तव्य शरद पवारांनी केले. आमची सर्वांची शरद पवार साहेबांना महाराष्ट्राच्या वतीने विनंती आहे, जर त्या कपाटाच्या चाव्या तुमच्याकडे असतील, तर त्या चाव्यांनी लवकरात लवकर ते कपाट उघडा किंवा मोदी साहेबांना ते कपाट उघडायला सांगा, असा टोमणा अनिल भाईदास पाटील यांनी पवारांना मारला. पण त्याचवेळी आमदारांच्या फाईली असण्याइतपत एकही दुष्कृत्य एकही आमदाराने किंवा मंत्र्याने केले नसल्याचा दावाही त्यांनी केला.

– पवार मागताहेत सहानुभूतीची मते

आजपर्यंत विकासाच्या आधारावर अजितदादांनी मते मागितली. सहानुभूती मिळण्यासाठी आजपर्यंत कधीही मत मागितली नाहीत. त्यामुळे अजितदादा ते देतात त्या आशीर्वादाच्या स्वरूपात परत सुद्धा मागतात. त्यामुळे या गोष्टींना कुठलेही तथ्य नाही. पायाखालची वाळू घसरल्यामुळेच विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता. केवळ धादांत खोटं बोलायचं वेगळ्या दिशेला प्रचाराचा मुद्दा न्यायचा सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा. या गोष्टी आपल्याला आजच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत, असे एकापाठोपाठ एक टोले अनिल भाईदास पाटलांनी पवारांना हाणले.

Ask Mr. Modi to open the cabinet of corruption files of NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात