सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांच्या गटाला इशारा, शरद पवारांचा फोटो वापरू नका; अन्यथा ‘घड्याळ’ काढून घेऊ

Supreme Court warns Ajit Pawar's group, don't use Sharad Pawar's photo

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला शरद पवार यांचा फोटो वापरण्यास सुप्रीम कोर्टाचे न्या. सूर्यकांत आणि न्या. विश्वनाथन यांनी गुरुवारी मनाई केली आहे. मात्र तरीही फोटो वापरला तर ‘घड्याळ’ हे चिन्ह काढून घेऊ, अशी तंबीही दिली. शिवाय, भविष्यात पवार यांचा फोटो वापरणार नसल्याची लेखी हमी दोन दिवसांत द्यावी, असे अजित पवार यांचे वकील मुकुल रोहतगी आणि मणिंदरसिंग यांना न्यायालयाने सांगितले आहे. Supreme Court warns Ajit Pawar’s group, don’t use Sharad Pawar’s photo

निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह दिले आहे. त्याविरोधात शरद पवारांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आयोगाने पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे चिन्ह दिले आहे. ते लोकसभेपर्यंत कायम ठेवण्याच्या पवारांच्या अर्जावर २२ मार्चला सुनावणी होणार आहे.



पण तत्पूर्वी अॅड. सिंघवी यांनी पवारांचे फोटो वापरण्यास मनाई करावी, असा अर्ज केला. मंत्री छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांना पवारांचा फोटो वापरण्याबाबत सांगत असल्याचे निदर्शनास आणले.

सुसंस्कृत नेते यशवंतरावांचा फोटो वापरतो : अजित पवार

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पूर्वी एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार आम्ही त्यांचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलले होते. तेव्हापासून आम्ही फोटो वापरणे बंद केले. आता आमच्या बॅनरवर सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो असतो.’

Supreme Court warns Ajit Pawar’s group, don’t use Sharad Pawar’s photo

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात