विशेष प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार चीफ व्हिप आणि इंडिया आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गोंधळ घातला. अजित पवार गटाचे कार्यकर्ते आव्हाड यांच्या घरी प्रभू श्रीरामाच्या चित्राची आरती करण्यासाठी आले होते. NCP Ajit Pawar group aggressive after Jitendra Awhads controversial statement about Prabhu Ramchandra
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शिबिर सुरू आहे. या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी झालेल्या बैठकीत प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते. त्यांनी वनवासाची 14 वर्षे घालवली तेव्हा शिकार करून मांस खाल्ल्याचे म्हटले. यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
आव्हाड यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी विवियाना मॉलजवळील त्यांच्या घराजवळ घोषणाबाजी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भगवान श्रीरामाची प्रतिमाही हातात धरली. जय श्रीराम-जय श्रीराम… जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, मुर्दाबाद… अशा घोषणा दिल्या.
या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांचे वैयक्तिक पीए अभिजित पवार यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित शिर्डी येथे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिरासाठी गेले होते आणि यावेळी महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते शिर्डीत उपस्थित होते आणि याचा लाभ घेत अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. अभिजित पवार म्हणाले की, जर तुम्हाला गदारोळ घालायचा होता तर आम्हाला कळवायचे होते, मग आम्हीही आंदोलन कसे केले जाते ते सांगू.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून आव्हाडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून त्या पत्रात 22 जानेवारी रोजी श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा असल्याने त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी आणि मांसबंदी लागू करण्याची विनंती केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more