‘हिट अँड रन’ कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नाही, संप मागे घेण्याचे आवाहन!


वाहनचालकांच्या चिंतेवर सरकार खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिट अँड रन (अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाणे) या नवीन कायद्याच्या विरोधात दोन दिवसांपासून सुरू असलेला ट्रकचालकांचा विरोध लवकरच संपुष्टात येईल. केंद्र सरकारने ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) सोबत झालेल्या बैठकीनंतर चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. या कायद्याची सध्या अंमलबजावणी होणार नसल्याचे सरकारने सांगितले. ‘Hit and Run’ law will not be implemented at present, appeal to withdraw the strike

या कायद्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, असे गृहमंत्रालयाने बैठकीनंतर सांगितले. अशा परिस्थितीत वाहनचालकांच्या चिंतेवर सरकार खुल्या मनाने चर्चा करण्यास तयार आहे.

गृह सचिव अजय भल्ला म्हणाले, “भारतीय फौजदारी प्रक्रिया (बीएनएस) कलम 106 (2) मध्ये 10 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाच्या तरतुदीबाबत आम्ही वाहनचालकांच्या चिंतेची दखल घेतली आहे.”

भल्ला पुढे म्हणाले, “ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआयएमटीसी) च्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. या तरतुदींची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, हे सरकारला निदर्शनास आणून द्यायचे आहे. आम्ही कळवू इच्छितो की हे कलम लागू करण्यापूर्वी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टशी चर्चा केली जाईल. आम्ही सर्व चालकांना त्यांच्या कामावर परतण्याचे आवाहन करतो.

‘Hit and Run’ law will not be implemented at present, appeal to withdraw the strike

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात